उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- सध्याच्या घडीला शहरातील व ग्रामीण भागातील अनेक रस्ते गुळगुळीत असल्याने सर्वात जास्त अल्पवयीन मुले ओठांवर मिसरूड फुटण्याच्या अवस्थेतच शहरातील व ग्रामीण भागातील गल्लीबोळातून रस्त्यांवरून सुसाट वेगाने वाहने चालवित असल्याने जणूकाही नागरिकांच्या जीवावर उठले की काय? अशी अवस्था सगळीकडे निर्माण झाली असल्याने अशांवर आवर घालणे आवश्यक आहे.
अनेक वाहन चालकांकडे वाहन चालविण्याचा परवानासुद्धा नाही.शहरात वाहतूक सुरळीत राहावी, म्हणून वाहतूक शिपायांची नेमणूक करण्यात आली आहे.वाहतुकीचे नियम पाळावे,वाहन चालकांकडे परवाना,वाहनांची कागदपत्रे तपासणीची जबाबदारी वाहतूक पोलिसांची आहे.मात्र ग्रामीण भागात सैराट होऊन सुसाट वेगाने वाहने चालविणाऱ्यांवर कारवाई कोण करणार? असा प्रश्न पडला आहे.कमी वयाची मुले सुसाट वेगाने वाहन चालवतात. परंतु,त्यांच्यावर कारवाई होतांना दिसत नाही.
वेळप्रसंगी चोरीचे वाहन घेऊन जाणारे छातीठोकपणे पोलिसांच्या समोरून निघून जातात.अनेकवेळा सैराट होऊन सुसाट वेगाने दुचाकी पळविणाऱ्या वाहनांमुळे अपघात होत आहेत.परिणामी,किरकोळ अपघात नेहमीच घडतात,याकडे संबंधितांनी लक्ष देणे गरजेचे आहे.