- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी आज सोमवारी महाराष्ट्र राज्याचा वर्ष २०२५-२६ चा अर्थसंकल्प सादर केला.अर्थमंत्री म्हणून अजित पवार यांनी त्यांच्या कारकिर्दीतील अकरावा अर्थसंकल्प सादर केला. राज्याच्या अर्थसंकल्पात गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी महत्वाच्या तरतुदी करण्यात आल्या आहेत.गडचिरोली जिल्ह्याला ‘स्टील हब’ म्हणून विकसित करण्यासाठी ५०० कोटी रुपयांच्या खनिकर्म महामार्ग प्रकल्पाची घोषणा करण्यात आली आहे.
याशिवाय,आरमोरी येथे रेशीम कोष खरेदी-विक्री बाजारपेठ स्थापन केली जाणार आहे.तसेच,दावोस येथे झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेत गडचिरोलीसाठी २१८३० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार करण्यात आले असून,त्यातून ७ हजार ५०० नवीन रोजगार निर्मितीची अपेक्षा आहे.
विदर्भातील विमानतळ विकासाच्या दृष्टीनेही या अर्थसंकल्पात विशेष तरतुदी करण्यात आल्या असून, गडचिरोलीत नवीन विमानतळाच्या सर्वेक्षण आणि अन्वेषणाची कामे सुरू झाली आहेत.गडचिरोलीच्या विकासाला नवी दिशा देणाऱ्या या घोषणांमुळे जिल्ह्यात उद्योग,वाहतूक आणि रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात निर्माण होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
- Advertisement -