उद्रेक न्युज वृत्त
संपादक/सत्यवान रामटेके
गडचिरोली :- शासकीय कामांचा पाच दिवसांचा आठवडा अधिकारी व कर्मचारी वर्गांसाठी हल्ली लाभदायक ठरत असल्याची बाब निदर्शनास येऊ लागली आहे.सध्याच्या घडीला १ एप्रिल २०२३ पासून संपूर्ण महिन्यात सलग १३ दिवस शासकीय सुट्ट्या तर केवळ १७ दिवसच शासकीय कार्यालय असल्याने अशातही काहीजण कार्यालयांना दांडी मारीत आहेत. त्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांची ‘चांदीच चांदी’ तर सर्वसामान्य जनतेची ‘वांदीच वांदी’ असे दिसून येत आहे.
सध्या सुरू असलेल्या संपूर्ण एप्रिल २०२३ महिन्यात १ एप्रिल,८ एप्रिल,१५ एप्रिल,२२ एप्रिल व २९ एप्रिल ह्या शनिवारच्या सुट्ट्या तर २ एप्रिल,९ एप्रिल,१६ एप्रिल,२३ एप्रिल व ३० एप्रिल ह्या रविवारच्या सुट्ट्या आहेत.अशातच शासनाच्या वतीने ४ एप्रिल महावीर जयंती,७ एप्रिल रोजी गुडफ्रायडे ते १४ एप्रिल रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती अशा मिळून सलग १३ दिवस सुट्ट्या शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी मिळाल्या असल्याने कर्मचाऱ्यांची चांदीच-चांदी झाली आहे.
पाच दिवसांचा आठवड्याचा शासन स्तरावरून अधिकारी,कर्मचारी वर्गांसाठी घेतलेला निर्णय योग्य जरी वाटत असला; तरी सर्वसामान्य जनतेसाठी डोकेदुखी ठरू लागला आहे.’शासकीय काम आणि पुन्हा थोडे दिवस थांब’अशी अवस्था सध्याच्या घडीला निर्माण झाली आहे.म्हणजेच यांना ‘पेन्शन व इतरांना टेन्शन’ दोन वेळेसची रोजी-रोटी कमावणाऱ्यांना ना पाच दिवसांचा आठवडा असतो.ना चार दिवसांचा आठवडा; शेतकरी बांधवांना तर सगळेच दिवस सारखेच असतात.मात्र यांचा विचार करणार कोण?आपल्या देशात एक अनोखा व अजब-गजब कारभार पहावयास मिळतो आहे.जो मेहनती व जास्त काम करतो; त्यांस कमी वेतन वा कमी मजूरी मिळत असते.मात्र जो आरमदायी पंखे,कुलर,एसीच्या खोलीत बसून ‘आऊबे लड्डू जाऊबे लड्डू’ काम करतोय; त्यांस अमाप वेतन मिळत आहे.ही शोकांतिका आहे.अशातच शेतकरी बांधवांना वयोमानानुसार पेन्शन,बेरोजगारांना बेरोजगारी भत्ता,कामगार बंधूंना पेन्शन महिला वर्गांसाठी विविध योजना शासन स्तरावरून राबविण्यात याव्यात; अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.