उद्रेक न्युज वृत्त
बिहार(नालंदा) :- शालेय किंवा महाविद्यालयीन परीक्षांदरम्यान विचित्र घटना घडल्याचे आपण अनेकदा ऐकतो,वाचतो; विद्यार्थ्यांनी सामूहिक कॉपी करने,पेपर फुटने,परीक्षेदरम्यान एखाद्या विद्यार्थी-विद्यार्थिनीची तब्येत बिघडने अशा घटना परीक्षा केंद्रावर घडत असतात.सध्या एक अशीच पण काहीशी विचित्र घटना जोरदार चर्चेत आहे. बिहारमधल्या एका परीक्षा केंद्रावर मुलींची गर्दी पाहून चक्क एक मुलगा बेशुद्ध पडला असल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहे.सध्या या घटनेची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.हा मुलगा नेमक्या कोणत्या कारणामुळे बेशुद्ध पडला, हे जाणून घेण्यासाठी लोक उत्सुक असल्याचे दिसून येत आहे. `झी न्यूज हिंदी`ने याविषयी माहिती देणारे वृत्त दिले आहे.