Monday, August 10, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तअन् महिला जवानाने लगावली अभिनेत्री कंगना रणौतच्या कानशिलात…

अन् महिला जवानाने लगावली अभिनेत्री कंगना रणौतच्या कानशिलात…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :- हिमाचल प्रदेशातील मंडीमधून लोकसभा निवडणूक जिंकलेल्या अभिनेत्री कंगना रणौतला चंदीगड विमानतळावर तैनात असलेल्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या महिला जवानाने मारहाण केल्याचे समोर आले आहे.कंगनाने गंभीर आरोप केले असून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.कंगनाला कानाखाली मारणाऱ्या महिला जवानाचे नाव कुलविंदर कौर असल्याचे सांगण्यात येत आहे.दरम्यान,आता या महिला अधिकाऱ्याने कंगनाला का कानशिलात मारली याचे कारण समोर आले आहे.याबाबत एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.थापड मारल्याचा आरोप असलेल्या सीआयएसएफ महिला जवानाचा व्हिडीओ समोर आला आहे.व्हिडीओमध्ये महिला कर्मचारी काय म्हणतेय त्यावरून स्पष्टपणे दिसत आहे की,शेतकरी आंदोलनाबाबत कंगना राणौतच्या जुन्या विधानावरुन तिने थप्पड मारली असल्याचे दिसत आहे.

समोर आलेल्या व्हिडिओमध्ये ही सीआयएसएफ महिला जवान बोलत आहे की, ‘शेतकऱ्यांच्या आंदोलनात महिला प्रत्येकी १०० रुपये घेऊन बसायच्या,असे कंगनाने सांगितले होते.माझी आई पण तिथे होती,असेही ती महिला जवान सांगत आहे. खासदार कंगना रणौतने दिलेल्या तक्रारीनुसार,कंगना चंदीगड विमानतळावर पोहोचल्यावर सुरक्षा तपासणीनंतर ती बोर्डिंगसाठी जात असताना एलसीटी कुलविंदर कौर (सीआयएसएफ युनिट चंदीगड विमानतळ) या महिला जवानाने कंगना यांना थापड मारली.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सर्पदंशग्रस्त चिमुकलीला नागपूरला हलविले..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील जपतलई येथील अनुदानित आश्रमशाळेत सर्पदंश झालेल्या कुमारी दीपिका बिलकुरासाय मडावी वय ११ वर्षे हिला पुढील उपचारासाठी जिल्हा प्रशासनाने...

दुःखद घटना..! तीन शालेय विद्यार्थिनींचा सर्पदंशाने मृत्यू; तर अन्य तीन विद्यार्थिनींवर उपचार सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील जपतलई येथील अनुदानित आश्रमशाळेत सर्पदंशामुळे तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे.या घटनेची प्रशासनाने गंभीर दखल...

आरमोरी येथे आरपीआयची बैठक संपन्न; विविध विषयांवर विचारमंथन..

उद्रेक न्युज वृत्त  आरमोरी(गडचिरोली):-रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आरपीआय)च्या वतीने आरमोरी येथील विश्राम गृहात नुकतीच पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.या बैठकीत पक्ष संघटन मजबूत करण्यासह विविध सामाजिक,राजकीय...

देसाईगंजच्या शंकरपूर येथे जागतिक आदिवासी दिन साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या  आदिवासी गोंड गोवारी समाज संघटना शाखा शंकरपूर यांच्या वतीने आज,रविवार ९ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून गावात विविध कार्यक्रमांचे आयोजन...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!