- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-शासकीय धान खरेदी केंद्रावर हमीभावाने धानाची विक्री करण्यासाठी शासनाच्या ऑनलाइन पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी न केलेल्या शेतकऱ्यांना हमीभाव आणि बोनस मिळण्यापासून वंचित राहावे लागणार असून नोंदणी करण्यासाठी १५ डिसेंबरपर्यंतच मुदत असल्याने शेतकऱ्यांनी या कालावधी नोंदणी करून घ्यावी; अन्यथा शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करण्यापासून वंचित राहावे लागेल आहे.
शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये,यासाठी शासनाकडून जिल्हा मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळाकडून हमीभावाने धान खरेदी केली जाते.जिल्हा मार्केटिंग फेडरेशनअंतर्गत जिल्ह्यात धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहेत.केंद्रावर धान विक्री करण्यासाठी १५ डिसेंबर पर्यंतच मुदत आहे. ज्यांची ‘ई पीक पाहणी’ झालेली नाही; अशांना हमीभाव आणि बोनसला मुकावे लागणार आहे. मागील दोन वर्षांपासून शासनाकडून शेतकऱ्यांना सरसकट बोनसचा लाभ दिला जातो आहे.त्यामुळे काही प्रमाणात शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.हमीभाव आणि बोनसमुळे काही दिवसात धान खरेदी केंद्रावर धानाची आवक वाढण्याची शक्यता आहे.
- Advertisement -