Monday, August 24, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्त...अन्यथा पीएम किसान योजनेचे दोन हजार विसरा..!

…अन्यथा पीएम किसान योजनेचे दोन हजार विसरा..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी समान तीन हप्त्यांमध्ये ६ हजार रुपये जमा करण्यात येतात. आतापर्यंत या योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी आणि आधार व्हेरिफिकेशन आवश्यक होते.मात्र,आता केंद्र सरकारने ‘फार्मर आयडी’ म्हणजेच शेतकरी ओळखपत्र अनिवार्य करून नवा नियम लागू केला आहे. गेल्या काही वर्षांत पीएम किसान योजनेचा लाभ लाखो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत असतांना काही ठिकाणी गंभीर गैरप्रकार आढळले.चुकीची नोंदणी,चुकीची कागदपत्रे, बँक खात्यातील त्रुटी आणि बोगस लाभार्थी यामुळे सरकारचे मोठे नुकसान झाले.काही प्रकरणात तर शेतकरी नसलेली माणसेही योजनेचा हप्ता घेत असल्याचे समोर आले.त्यामुळे या त्रुटी दूर करण्यासाठी ‘फार्मर आयडी’ हा मुख्य उपाय म्हणून सरकारने पुढे आणला आहे.यामुळे योजना अधिक पारदर्शक होणार असून बनावट लाभार्थ्यांवर मोठी कारवाई होणार आहे. त्यामुळे ‘फार्मर आयडी’ नोंदविल्याशिवाय आगामी हप्ते बँक खात्यात जमा होणार नाहीत.म्हणजेच ज्यांनी अद्याप ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही,त्यांना लवकरात लवकर आयडी बनवावी लागेल.आतापर्यंत पीएम किसान योजनेचे शेतकऱ्यांच्या खात्यात २१ हप्ते जमा करण्यात आले आहेत.तत्पूर्वी  २२ व्या हप्त्यापूर्वी ही नवीन अट लागू होत आहे.फार्मर आयडी लागू झाल्यानंतर शेतकरी थेट डिजिटल प्लॅटफॉर्मशी जोडला जाईल.त्याला त्याच्या नावावर कोणत्या योजना चालू आहेत,किती अनुदान मिळाले आहे,विमा किती मिळाला,पीक कर्जाची स्थिती काय आहे,याची माहिती एका क्लिकवर समजू शकेल. त्यामुळे त्याची फसवणूक होणार नाही आणि कोणतीही रक्कम चुकीच्या व्यक्तीच्या खात्यात जाण्याचा धोका कमी होईल.पीएम किसान योजनेत ‘फार्मर आयडी’ अनिवार्य केल्याने केंद्र सरकारने बोगस लाभार्थ्यांना एकप्रकारे मोठा झटका दिला आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अंगावर भिंत कोसळून चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातून आज,सोमवार २४ ऑगस्ट रोजी एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे.अर्जुनी मोरगाव तालुक्यातील खामखुरा गावात घरासमोरील अंगणात...

माता व बालक मृत्यू प्रकरणी चौकशी समिती गठीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या चामोर्शी येथील प्रसूती प्रकरणात माता व बालकाच्या मृत्यूची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक स्तरावर चौकशी समिती गठीत करण्यात...

देसाईगंज आदर्श महाविद्यालयात वाणिज्य विद्यार्थी अभ्यास मंडळाची स्थापना.. – विद्यार्थ्यांनी आत्मनिर्भर बनावे- प्रा.डॉ.निलेश हलामी

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय देसाईगंज येथे महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डाॅ.श्रीराम गहाणे यांच्या मार्गदर्शनात शैक्षणिक सत्र २०२६-२७ करिता वाणिज्य विद्यार्थी अभ्यास मंडळाची स्थापना...

धावत्या बसमधून खाली कोसळताच दुसऱ्या बसने चिरडले; तरुणीचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-पुण्यातील सिंहगड मार्गावरील माणिकबाग परिसरात आज,सोमवार २४ ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास भीषण अपघाताची घटना घडली. खानापूर-स्वारगेट मार्गावरील धावत्या पुणे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!