- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-महाराष्ट्रात पनीर सारखे दिसणारे चीज ॲनालॉगचे उत्पादन,साठवणूक,वितरण आणि विक्रीवर प्रतिबंध असतांनाही काही विक्रेते ग्राहकांची फसवणूक करून मोठ्या प्रमाणात चीज ॲनालॉगची विक्री करतांना दिसून येतात.अश्यातच या विक्रीविरोधात अन्न व औषध प्रशासनाने(एफडीए) नागपुरात धडक कारवाई करत शहरातील दोन डेअरी आस्थापनांतील चीज ॲनालॉग व दुग्धजन्य पदार्थांचा साठा जप्त करून कारवाईचा बडगा उगारला.यात तब्बल २३ हजार किलोचा जवळपास ४६ लाख रुपये किंमतीचा चीज ॲनालॉग व दही नष्ट करण्यात आला.यात नागपूर शहरातील मे.चंद्रा डेअरी,पिवळी नदी, वांजरा आणि मे.शिवम डेअरी फूड प्रॉडक्ट्स,ईंटा भट्टी चौक येथे ‘एफडीए’च्या पथकाने तपासणी केली.यात ‘चंद्रा डेअरी’ येथे दही,चीज ॲनालॉग आणि स्किम मिल्क पावडरचे नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले.त्यानंतर ४२ लाख ३० हजार ६९० रुपये किंमतीचा २२ हजार ३५ किलोचा साठा जप्त करण्यात आला. ‘शिवम डेअरी फूड प्रॉडक्ट्स’ येथे उत्पादित चीज ॲनालॉगचा नमुना घेण्यात आल्यानंतर ४ लाख ६२ हजार ८०० रुपयांचा १ हजार ९३० किलोचा साठा जप्त करण्यात आला.राज्यात चीज ॲनालॉगचे उत्पादन, साठवणूक,वितरण आणि विक्रीवर प्रतिबंध घालण्यात आला आहे.त्यानुसार या दोन्ही आस्थापनांमधील दही व चीज ॲनालॉगचा साठा नष्ट करण्यात आला.
- Advertisement -

