Tuesday, June 16, 2026
Homeगडचिरोलीअन्न व औषध प्रशासन गडचिरोली जिल्ह्याने संपुर्ण महाराष्ट्रात पटकाविला १६ वा क्रमांक...

अन्न व औषध प्रशासन गडचिरोली जिल्ह्याने संपुर्ण महाराष्ट्रात पटकाविला १६ वा क्रमांक – गुणवत्ता व जनजागृतीच्या जोरावर देशात मानांकन

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- केंद्र शासनाच्या Eat Right India या उपक्रमाअंतर्गत Eat Right Challenge-२ ही स्पर्धा अन्न सुरक्षा व मानदे प्राधिकरण नवी दिल्ली यांच्या मार्फत २०२२-२३ या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आली होती.या स्पर्धेत देशभरातील  जिल्ह्यांनी भाग घेतलेला होता.यात उत्कृष्ठ काम करणाऱ्या देशभरातील २६० जिल्ह्यांची निवड करण्यात येणार होती.

सदर स्पर्धेत प्रामुख्याने अन्न परवाने व नोंदणी यांची संख्या वाढविणे,तक्रारीचा निपटारा करणे,जनजागृती करणे,अन्न नमुने विश्लेषणासाठी घेणे,सर्व्हेक्षण नमुने घेणे व इतर विशेष कामकाजाचे मुल्यांकन करुन गुण देण्यात आले होते.

या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहिर झाला असुन गडचिरोली जिल्ह्याने संपुर्ण महाराष्ट्रात १६ वा क्रमांक पटकाविला आहे.उल्लेखनिय बाब म्हणजे गडचिरोली जिल्ह्यातील अन्न व औषध प्रशासनात मनुष्यबळाची कमतरता आहे.तसेच बिकट भौगोलिक परिस्थिती असलेल्या या जिल्ह्यात एकच अन्न सुरक्षा अधिकारी कार्यरत असून त्यांनी २ अतिरीक्त पदाचा अतिरीक्त कार्यभार सांभाळुन सर्व अडचणींवर मात करुन राज्यात १६ वा क्रमांक व संपुर्ण देशात १२० वा क्रमांक पटकाविला आहे.गडचिरोली जिल्ह्यात सदर स्पर्धेअंतर्गत दैनदिन अंमलबजावणी कामकाज तसेच अन्न परवाना व नोंदणी घेण्याकरीता विशेष कॅम्पचे आयोजन केले.या कालावधीत सुमारे ६४ सर्वेक्षण नमुने घेऊन अन्न व्यावसायीकांना FOSTAC प्रणालीचे प्रशिक्षण आयोजित केले.त्याचप्रमाणे आंतराष्ट्रीय तृणधान्य वर्षाचे औचित्य साधून प्रभात फेरी तसेच विविध शाळेत जाऊन मुलांना पौष्टीक आहार संबंधी माहिती देणे व जंकफूडच्या दुष्परिणामावर मार्गदर्शन करणे,तंबाखु मुक्तीबाबत विद्यार्थ्यांना शपथ देण्यात आली.तसेच High Risk  असणारे अन्न नमुने काढले.तसेच विविध खाद्यव्यसायीकांच्या बैठका घेऊन त्यांना कायद्याबाबतची माहिती सुद्धा देण्यात आली होती.या सर्व उपक्रमांचे अन्न सुरक्षा मानदे प्राधिकरण,नवी दिल्ली यांनी मुल्यांकन करुन गडचिरोली जिल्ह्याला बहुमान दिला.सदर स्पर्धा यशस्वी करण्याकरीता नोडल अधिकारी तथा सहायक आयुक्त अभय देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली अन्न सुरक्षा अधिकारी सुरेश तोरेम यांनी विशेष परिश्रम घेतले.असे सहायक आयुक्त अन्न व औषध प्रशासन,(म.रा.)गडचिरोली यांनी कळविले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज नागपुरात कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन.. – सप्तखंजिरीवादक प्रबोधनकार सत्यपाल महाराज होणार सहभागी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नीटच्या प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा,या मागणीसाठी कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीने आज, मंगळवार १६ जून २०२६ रोजी...

गडचिरोली जिल्ह्यात तब्बल ११७ ‘आपले सरकार सेवा केंद्र’ होणार स्थापन.. – केंद्र चालक निवडीसाठी अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नागरिकांना शासकीय सेवा स्थानिक पातळीवर सुलभपणे उपलब्ध करून देण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यात ११७ ‘आपले सरकार सेवा केंद्र’ स्थापन करण्यात येणार आहेत.यामध्ये ११५...

आता प्रथमच होणार जिल्हानिहाय श्रमशक्ती सर्वेक्षण आणि असंघटित क्षेत्रातील उद्योगांचे वार्षिक सर्वेक्षण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याच्या ‘विकसित महाराष्ट्र’ या संकल्पनेला गती देण्यासाठी प्रथमच जिल्हानिहाय श्रमशक्ती सर्वेक्षण आणि असंघटित क्षेत्रातील उद्योगांचे वार्षिक सर्वेक्षण राबविण्यात येत असून,गडचिरोली जिल्ह्यात...

उद्यापासून आरटीओ कर्मचारी बेमुदत संपावर; अनेक कामे पडणार ठप्प..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-महाराष्ट्र राज्यातील आरटीओ कर्मचाऱ्यांच्या बऱ्याच कालावधीपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांसंदर्भात प्रशासन सकारात्मक भूमिका न घेता केवळ वेळखाऊ धोरण राबवत असल्याचा आरोप करत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!