नागपूर :-नागपूरहून कारने भंडाऱ्याकडे परत जात असतांना वाटेतच अनियंत्रित कार डिव्हायडरवर आदळली आणि तीन पलट्या घेऊन भीषण अपघात झाल्याची घटना मध्यरात्रीच्या सुमारास नागपूर जिल्ह्यातील कुही-मांढळ फाट्याजवळ घडली. झालेल्या भीषण अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला तर पती,मुलगी व भाऊ गंभीर जखमी झाला आहे.नीलम शेंडे वय २७ वर्षे असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.तर जखमींमध्ये तिचे पती कृष्णा शेंडे,४ वर्षीय मुलगी देवांशी आणि भाऊ हेमंत साऊस्कार यांचा समावेश आहे.हे चौघेही भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील पिंपळगाव कोहळी येथील रहिवासी आहेत.अपघात इतका भीषण होता, की वाहन चकनाचूर झाले आहे.कुही-मांढळ फाट्याजवळ मध्यरात्रीच्या सुमारास त्यांची कार अनियंत्रित झाल्याने डिव्हायडरवर आदळली आणि वाहनाने सलग तीन पलट्या घेतल्या.या अपघातात नीलम शेंडे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.स्थानिक नागरिकांनी अपघाताची माहिती पोलिसांना दिल्यानंतर त्वरित मदतकार्य सुरू करण्यात आले. जखमींना नागपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.
अनियंत्रित कार डिव्हायडरवर आदळून तीन पलट्या.. – महिलेचा जागीच मृत्यू तर पती,मुलगी व भाऊ गंभीर जखमी..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
- Advertisement -
मुख्य संपादक


सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक