उद्रेक न्युज वृत्त
लाखांदूर :- सिंधु कुंडलिक लांडगे यांच्या मालकी हक्काच्या शेतीच्या जागेवर नवनिर्वाचित महिला सरपंचाच्या कुटुंबीयांनी अनधिकृरीत्या घरकुलाचे बांधकाम करण्यात आल्याने लांडगे यांनी लाखांदूर न्यायालयात धाव घेतली असता अखेर न्यायालयाच्या आदेशानुसार सदर दोन्ही बांधकामे पाडण्यात आली.
परसोडी/नाग येथील नवनिर्वाचित महिला सरपंचा अनिता चंद्रशेखर बोरकर यांच्या सासु सिताबाई रामा बोरकर व पती शेखर रामा बोरकर यांच्या नावे गेल्या पाच वर्षांपूर्वी शासनाच्या रमाई आवास योजने अंतर्गत घरकूल योजनेचा लाभ मिळाला होता.
मात्र बांधकाम सुरू असलेली जागा सिंधु कुंडलिक लांडगे यांच्या मालकीच्या शेतीच्या जागेवर असल्याने त्यांनी लाखांदूर दिवानी न्यायालयात धाव घेतली.बांधकाम पाडते वेळी महिला सरपंचांनी कायद्याचे पालन करून सहकार्य केले.