Sunday, August 9, 2026
Homeगडचिरोलीअधिकाऱ्यांसोबत गोड बोलून भ्रष्टाचार लपविण्याचा प्रयत्न; शेवटी निलंबितच झाला..!

अधिकाऱ्यांसोबत गोड बोलून भ्रष्टाचार लपविण्याचा प्रयत्न; शेवटी निलंबितच झाला..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्यातच नव्हे तर तर संपूर्ण देशात गैरव्यवहार तथा भ्रष्टाचाराने कळस गाठला आहे.काही अधिकारी,कर्मचारी पदाचा दुरुपयोग करून जास्तीत- जास्त वरच्या कमाईकडे लक्ष घालू लागलेत.असा कोणताही क्षेत्र सुटलेला नाही की,ज्यात वरच्या कमाई शिवाय कामेच होत नाहीत.अश्यातच गडचिरोली तालुक्याच्या अडपल्ली ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक दिलीप मेश्राम यांनी ग्रामपंचायतीत कार्यरत असतांना  निकृष्ट दर्जाची कामे करणे,विना वाहतूक चालान अवैध रेती उचल करणे,ई-टेंडर न करताच साहित्याची खरेदी करणे,अंदाज पत्रकाशिवाय कामे करणे, ऑनलाइन आराखड्यात मंजूर रकमेपेक्षा जास्त खर्च करणे,कोटेशन ग्रामपंचायतच्या सभेत मंजूर न करणे, बांधकामासाठी मंजुरी न घेणे,घरटॅक्स वसुली केलेली रक्कम बँकेत जमा न करता अफरातफर करणे,खरेदी रकमेच्या बिलातून दोन टक्के जीएसटी न भरणे व स्वतःच्या मुलाच्या नावाने ई-टेंडर भरणे इत्यादी कामे नियमांना डावलून केल्याने,याबाबत ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांनी बीडीओकडे(गट विकास अधिकारी)यांच्याकडे तक्रार केली.बीडीओंनी प्रकरण गडचिरोली मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांच्याकडे सादर केले.त्यानुसार चौकशी करण्यात आली.चौकशीअंती भ्रष्टाचार व गैरव्यवहार उघडकीस आल्याने अडपल्ली ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक दिलीप मेश्राम यांना निलंबित करण्यात आले आहे.मेश्राम यांनी गेल्या चार वर्षात म्हणजेच २०२१ पासून ग्रामपंचायतीत मोठा भ्रष्टाचार चालवला होता.त्यातच गैरव्यवहार प्रकरणाची तक्रार २०२१ मध्येच करण्यात आली होती.परंतु मेश्राम ग्रामसेवक हे ग्रामपंचायत सोडून दररोज बीडीओंकडे चकरा मारत होते.अधिकाऱ्यांसोबत गोड बोलून भ्रष्टाचार लपविण्याचा प्रयत्न करीत होते.शेवटी गडचिरोलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांच्याकडे तक्रार जाताच भ्रष्टाचार व गैरव्यवहार प्रकरणी दिलीप मेश्राम यांना निलंबित व्हावे लागले.मेश्राम यांची चौकशी करण्यासाठी बीडीओंनी तब्बल तीन वर्षे लावल्याने नवलाचीच बाब म्हणावी लागेल.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीचा शोध घेण्यात पोलिसांना यश..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याच्या दाखल गुन्ह्यात १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी व तिच्यासोबत असलेल्या संशयित आरोपीचा शोध घेण्यात अनैतिक...

रेल्वेची जोरदार धडक; बिबट्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या राजुरा वनपरिक्षेत्राच्या मूर्ती वनक्षेत्रातून गेलेल्या दक्षिण मध्य रेल्वेच्या बल्लारशाह-काजीपेठ रेल्वे मार्गावरील कक्ष क्रमांक-५९० मधील पोल क्रमांक १५२/२६ नजिक एका नर बिबट्याचा रेल्वेच्या...

ऑनलाईन केवायसीच्या नावाखाली डॉक्टरची साडेसात लाखांची फसवणूक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका अज्ञात सायबर चोरट्याने ऑनलाईन केवायसीच्या नावाखाली डॉक्टरची तब्बल साडेसात लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार नागपूरच्या सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला. डॉ.राघवेंद्र...

एकेकाळी ज्या भागात फडकायचे लाल,काळे झेंडे; आता पहिल्यांदाच फडकणार तिरंगा..

उद्रेक न्युज वृत्त :-देशातील नक्षलवादाची संपूर्ण मुळे ३१ मार्च २०२६ पर्यंत उपटून फेकण्यात येणार असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जाहीर करताच राज्याच्या विविध जिल्ह्यातील...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!