Friday, June 19, 2026
Homeगोंदियाअजब सरपंचाचा गजब कारनामा…! चक्क सरपंचाने सादर केले खोटे जातप्रमाणपत्र…-तक्रारी अंती आता...

अजब सरपंचाचा गजब कारनामा…! चक्क सरपंचाने सादर केले खोटे जातप्रमाणपत्र…-तक्रारी अंती आता बसले घरी….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गोंदिया :- दीड वर्षांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत गोंदिया तालुक्यातील बिरसी (कामठा) येथील संतोष प्रकाश सोनवाणे हे सरपंचपदी विराजमान झाले होते.परंतु त्यांनी खोटे दस्तावेज सादर करून जात प्रमाणपत्र बनविले असे चौकशीअंती निष्पन्न झाल्याने जिल्हाधिऱ्यांनी त्यांचे जात प्रमाणपत्र रद्द करीत त्यांना सरपंच पदावरून पायउतार करीत घरी बसवले आहे.

डिसेंबर २०२२ मध्ये ग्रामपंचायत बिरसी (का.) ची सार्वत्रिक निवडणूक घेण्यात आली.त्यात सरपंच पद हे अनुसूचित जमातीसाठी (ST) आरक्षित असल्याने संतोष प्रकाश सोनवाणे हे सरपंचपदी विराजमान झाले.परंतु सरपंच संतोष सोनवाणे यांनी खोटे दस्तावेज सादर करून अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र बनविले,अशी तक्रार गावातील सुरेश पंधरे व इतर व्यक्तींनी जिल्हाधिकारी गोंदिया यांच्याकडे केली होती.याप्रकरणी जिल्हाधिकारी तसेच अनुसूचित जमाती जात पडताळणी समिती यांच्या चौकशीत सरपंच संतोष सोनवाणे हे दोषी आढळून आले.त्यामुळे सरपंच संतोष सोनवाणे यांना २६ जून पासून सरपंच पदावरून पायउतार करण्यात आले.

सुरेश मूलचंद पंधरे,तक्रारदार👇

विद्यमान सरपंच यांनी खोटे दस्तावेज सादर करून खऱ्या आदिवासी समाजावर अन्याय केला होता. त्यामुळे जिल्हाधिकारी महोदयांनी दिलेल्या आदेशाने आम्हा आदिवासी समाजाला न्याय मिळालेला आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावात येताच नक्षली समर्थक पोलिसांच्या तावडीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-तब्बल अकरा वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा नक्षल समर्थक अखेर पोलिसांच्या तावडीत सापडला.विशेष म्हणजे,कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावात येताच त्यास अटक करण्यात आली.त्याचा शोध...

देसाईगंजात सुगंधित तंबाखूविक्री जोमात; आरमोरीत अवैध सट्टा-पट्टी,तर कुरखेड्यात दारूचा महापूर..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या विविध तालुक्यात अवैध धंद्यांनी डोके वर काढले असून देसाईगंज शहर व तालुक्यात सुगंधित तंबाखूची खुलेआम विक्री,तर आरमोरी शहरापासून ते ग्रामीण...

जीएसटी नंबर मिळवून दिले नं..! आता दहा हजार द्या.. – राज्यकर निरीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-गलेलठ्ठ पगार असतांना एकदा कां ओवर कमाईची सवय लागली रे लागली,तर मग ज्या टेबलावर कुठलेही काम मोफत जरी होत असेल तरी...

स्थानिक उत्पादनांना मिळणार नवी ओळख; गडचिरोली ब्रँडसाठी स्वतंत्र लोगो आणि टॅगलाईन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-स्थानिक उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी स्वतंत्र 'गडचिरोली ब्रँड' विकसित करणे,पर्यटन विकासाला गती देणे,महिला बचत गटांना अधिक सक्षम बनविणे,धान साठवणुकीची क्षमता...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!