- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपुर :-जिल्ह्याच्या भिवापूर शहरात अजब रोड रोमियोचा गजब कारनामा उघडकीस येताच पोलिसांनी अटक केल्यानंतर लागलीच त्याला भिवापूर येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयापुढे हजर करण्यात आले. या गंभीर गुन्ह्याची नोंद घेत न्यायमूर्ती एस.जे.लाड यांनी आरोपीची थेट तुरुंगात रवानगी केली आहे.विशेष म्हणजे,२२ वर्षीय तरुणाची १९ वर्षीय तरुणीशी ना ओळख होती,ना पाळख.त्यातच कुठलेही प्रेमसंबंध नसतांना विद्यार्थिनीला वेठीस धरले.मला तुझ्याशी लग्न करायचे आहे,असे सांगत त्याने तिचा हात पकडला आणि विरोध होताच,त्याने थेट तिच्या गालाचा मुका(चुंबन)घेतला.प्रज्वल गजानन गोडे वय २२ वर्षे रा.मेढा ता.भिवापूर,जि.नागपूर असे आरोपीचे नाव आहे. तर पीडित १९ वर्षीय विद्यार्थिनी भिवापूर शहराच्या धर्मापूरपेठेत वास्तव्यास असून एका नर्सिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे.६ डिसेंबरच्या शनिवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास पीडित मुलगी धर्मापूर मुख्यमार्गे कॉलेजकडे जात असतांना आरोपीने पाठलाग करीत तिला टेलिफोन एक्सचेंज चौक परिसरात थांबवले.त्याने तिचा हात पकडला.मुलीने त्याला ओळखत नसल्याचे सांगत प्रतिकार केला आणि त्याला धक्का देऊन ती कॉलेजकडे निघून गेली.या घटनेनंतर काही तासांतच आरोपीने पुन्हा आपली विकृती दाखवली.सायंकाळी ४ वाजता कॉलेजला सुट्टी झाल्यावर मुलगी शिवाजी ले-आऊट मार्गे घराकडे जात असतांना आरोपीने लगतच्या गार्डनजवळ तिला पुन्हा अडवले. “मला तुझ्याशी लग्न करायचे आहे,” असे सांगत त्याने पुन्हा तिचा हात पकडला.मुलीने त्याला कडाडून विरोध केला असता तरुणाने क्रूरतेची हद्द ओलांडत तिच्या गालावर बळजबरीने मुका घेतला.मुलीने आरडाओरड करताच आरोपी पळून गेला.या घटनेनंतर पीडित मुलीने पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.लागलीच ठाणेदार जयप्रकाश निर्मल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ७४,७५(१),७८(१),७९ अन्वये गुन्हा नोंदवित आरोपीला काही तासातच अटक केली आणि न्यायालयात हजर करून त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली.
- Advertisement -

