Monday, August 31, 2026
Homeगडचिरोलीअखेर शेतकरी बांधवांना मिळाला दिलासा-धान खरेदीला २९ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

अखेर शेतकरी बांधवांना मिळाला दिलासा-धान खरेदीला २९ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- धान्य विक्रीसाठीऑनलाइन नोंदणीची शेवटची तारीख ३१ जानेवारी रोजी संपुष्टात आली असल्याने बऱ्याच पैकी शेतकरी बांधवांनी धान्य विक्रीसाठी खरेदी केंद्रावर नेले नसल्याची बाब निदर्शनास येऊ लागल्याने परत पुन्हा १५ दिवस म्हणजेच २९ फेब्रुवारी पर्यंत धान खरेदीला मुदतवाढ देण्यात आली असल्याने शेतकरी बांधवांना एकप्रकारे दिलासा मिळाला आहे.

शासकीय खरेदी केंद्रावर धान विक्रीसाठी यावर्षी मागील वर्षीच्या तुलनेत कमी शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली होती.ऑनलाइन नोंदणीची मुदतवाढ ३१ जानेवारी पर्यंत वाढवून देण्यात आल्याने धान खरेदी ९ नोव्हेंबर ते ३१ जानेवारी २०२४ पर्यंत निश्चित करण्यात आली होती.मात्र देण्यात आलेली मुदतवाढ संपल्याने शासकीय खरेदी केंद्रावर धान विक्रीचा पेच शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला होता.एकीकडे ऑनलाइन नोंदणीला मुदतवाढ दिलेली असताना व दुसरीकडे धान खरेदी पोर्टलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने बरेच दिवस धान खरेदी ठप्प राहिली. त्यामुळे ऑनलाइन नोंदणीपासून वंचित राहिलेले शेतकरी शासकीय खरेदी केंद्रावर धान विक्रीपासून वंचित राहू नये; याकरिता ऑनलाइन नोंदणीची १५ दिवस मुदतवाढ देण्यात आली आहे.गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी केवळ शेतीवर अवलंबून असुन मोठ्या प्रमाणात शेतकरी रब्बी धान पिकाच्या लागवडीत व्यस्त असतात.अनेक शेतकरी धान विक्रीसाठी शासकीय खरेदी केंद्रावर धान नेऊ शकले नाहीत.त्यामुळे संबंधित शेतकरी किमान आधारभूत धान खरेदी योजनेपासून वंचित राहिल्याने मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जाण्याची शक्यता निर्माण झाली होती.मुदत वाढीमुळे वंचित असलेले शेतकरी धान्य विक्रीसाठी मुकणार नाहीत. 

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

ई-पीक पाहणी नोंद घेणाऱ्यांकडून पैश्याची मागणी; तहसील कार्यालयात करा तक्रार..

उद्रेक न्युज वृत्त :-शासनाने 'खरीप हंगाम-२०२६' साठी ई-पीक पाहणीच्या कार्यपद्धतीत बदल करून गावनिहाय नियुक्त करण्यात आलेल्या पीक पाहणी सहाय्यकांमार्फत पिकांची नोंद करण्यात येत आहे.विशेष म्हणजे,शासकीय योजना,पीक कर्ज...

पुष्पा स्टाईलने सागवान लाकूड तस्करीचा डाव.. – घेराबंदी घालताच तस्करांनी ठोकली धूम..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा २०२१ मध्ये प्रदर्शित झालेला 'पुष्पा: द राईज' हा लोकप्रिय चित्रपट सर्वांच्याच लक्षात आहे.आंध्र प्रदेशच्या शेषाचलम जंगलातील लाल...

तब्बल बारा दिवसांपूर्वी आलेल्या धमकीच्या ‘ई-मेल’ ची धास्ती; उद्याला शाळांना सुट्टी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर शहरातील तब्बल डझनहून अधिक नामांकित शाळांसह १९ ठिकाणे बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल मंगळवार १८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास...

तब्बल २५० हून अधिक गावांचा ‘कुष्ठभयमुक्त व भेदभावमुक्त ग्राम’ संकल्प.. – कुष्ठांतेयांच्या प्रतिष्ठेसाठी ग्रामसभेत सर्वानुमते ठराव पारित..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-कुष्ठरोगाविषयी असलेली भीती,गैरसमज, कलंक आणि सामाजिक भेदभाव दूर करून कुष्ठांतेयांना सन्मानाने व प्रतिष्ठेने जगता यावे,या उद्देशाने चंद्रपूर, गडचिरोली,गोंदिया,पालघर व नंदुरबार जिल्ह्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!