- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बुधवार २० मे २०२६ रोजी शेतकरी कर्जमाफीवर मोठे भाष्य करून राज्यातील विधान परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्याने लागू झालेल्या आचारसंहितेचा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर कोणताही परिणाम होणार नसून,कर्जमाफी हा सरकारचा पूर्वनियोजित आणि धोरणात्मक निर्णय असल्याने या प्रक्रियेत आचारसंहितेचा कोणताही कायदेशीर अडथळा येणार नाही व येत्या ३० जूनपूर्वी राज्यातील बळीराजासाठी कर्जमाफीची अधिकृत घोषणा केली जाईल,असे स्पष्ट केले होते.त्यानुसार,केंद्रीय निवडणूक आयोगाने शेतकरी कर्जमाफी योजनेस हिरवा कंदील दिल्याने येत्या ३० जूनपूर्वीच शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यातील ज्या शेतकऱ्यांचे ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत पीक कर्ज आहे,त्यांना २ लाखांच्या मर्यादेत कर्जमाफी देण्याची तसेच नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार प्रोत्साहन निधी देण्याची घोषणा केली होती.मात्र,सध्या महाराष्ट्रात विधान परिषद निवडणुकांमुळे आदर्श आचारसंहिता लागू आहे.त्यामुळे राज्य सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफीचा निर्णय या आचारसंहितेत अडकण्याची शक्यता होती व कर्जमाफीचा निर्णय आणखी लांबणीवर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात होती.अश्यातच आता केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य सरकारला शेतकरी कर्जमाफीचा निर्णय राबवण्यास मंजुरी दिल्याने राज्यातील लाखो शेतकऱ्यांना ३० जून २०२६ पूर्वी या योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता वाढली आहे.
- Advertisement -

