उद्रेक न्युज वृत्त
संपादक/सत्यवान रामटेके
कुरखेडा(गडचिरोली) :- आपल्या घरच्या कुटुंबातील मुली वा इतर सदस्यांची काही चूक झाली वा तश्या प्रकारची चूक करू नये; याकरिता कुणीही आई-वडील आपल्या घरच्या सदस्यांना समजावीण्याचा प्रयत्न करीत असतात.कुणी हळू आवाजात बोलतो तर कुणी मोठ्या आवाजात गर्जना करीत असतो.मात्र कुणाला उद्देशून भाष्य केले जात आहे; हे समोरील व्यक्तीच्या विचार सरणीवर अवलंबून असते.ज्याची घुटण्यात अक्कल असते; असाच व्यक्ती मनावर घेत असतो. असाच प्रकार हल्ली कुरखेडा तालुक्यातील खरमतटोला येथे निदर्शनास आला आहे.
कुरखेडा पोलीस मुख्यालयापासून १४ किलोमीटर अंतरावर असलेल्या खरमतटोला येथे २ जून २०२३ रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास एका गरीब कुटुंबातील महिला आपले घरी काम करीत असतांना आपल्याच घरच्या मुलींना समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत होती.मात्र घरा समोरच्या कुटुंबातील तीन सदस्यांनी मनावर घेऊन सदर महिला आम्हालाच बोलत आहे; असे समजुन,धावत येवून पिडीत महिला वय ४५ वर्षे व ११ वर्षाच्या लहान मुलाला लाथा बुक्क्यांनी व काठीने मारहाण केल्याने शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले होते.यामध्ये आरोपी समीर हेमंत मेश्राम वय २३ वर्ष, कल्पना हेमंत मेश्राम वय ४२ वर्ष व सरगम हेमंत मेश्राम वय १९ वर्ष सर्व राहणार खरमतटोला पो.देऊळगाव,ता.कुरखेडा येथील रहिवाशी असून आरोपींवर भारतीय दंड संहिता १८६० नुसार कलम ३२४ व कलम ३४ लावण्यात आले असल्याने मुजोरी करणे पुढील दिवसांत महागात पडणार असल्याची खमंग चर्चा सर्वत्र परिसरात सुरू आहे.

