Sunday, April 19, 2026
Homeमुंबईअखेर भंडारा ते गडचिरोली समृद्धी महामार्गास ९३१ कोटी १५ लाख रुपयांच्या खर्चास...

अखेर भंडारा ते गडचिरोली समृद्धी महामार्गास ९३१ कोटी १५ लाख रुपयांच्या खर्चास मान्यता..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत आज,मंगळवार १६ सप्टेंबर रोजी उद्योग विभाग,वस्त्रोद्योग विभाग,सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग,सहकर व पणन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग,ऊर्जा विभाग व नियोजन विभागातील आठ महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. अश्यातच आज सार्वजनिक बांधकाम विभागातील घेण्यात आलेल्या मंत्रिमंडळ निर्णयात भंडारा ते गडचिरोली दरम्यान ९४ किलोमीटरचा समृद्धी(द्रुतगती) महामार्ग तयार होत असून प्रवेश नियंत्रित द्रुतगती महामार्ग प्रकल्प महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून उभारण्यात येणार आहे. प्रकल्पाच्या आखणीस व भूसंपादनास मान्यता मिळाली असून भुसंपादनासह अनुषंगिक बाबींसाठी ९३१ कोटी १५ लाख रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे.
राज्य शासनाने २०२४ मध्ये भंडारा ते गडचिरोली पर्यंत समृद्धी महामार्ग होईल,अशी घोषणा केली होती. त्यानुसार सर्वेक्षण व सदर मार्ग कुठून जाणार हे निश्चित करण्यात आले.भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यासह लाखांदूर,ब्रम्हपुरी,आरमोरी व गडचिरोलीपर्यंत मार्ग होणार आहे.मुंबई हे राज्याचे पश्चिमेकडील,तर गडचिरोली हे राज्याचे सर्वांत पूर्वेकडील टोक आहे.दोन्ही टोक जोडण्याची घोषणा शासनामार्फत करण्यात आली होती.विदर्भात नागपूरपर्यंत समृद्धी महामार्ग पोहोचला आहे.पुढे त्याचा विस्तार भंडाऱ्यापर्यंत व तेथून त्याचा विस्तार गडचिरोलीपर्यंत करण्याची घोषणा राज्य शासनाने घोषणा केली होती.त्यानुसार आता भुसंपादनासह अनुषंगिक बाबींसाठी ९३१ कोटी १५ लाख रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली असल्याने येत्या काळात भंडारा ते गडचिरोली समृद्धी महामार्गावरील अनेकांचा प्रवास सुकर होणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाहनधारकांसाठी दिलासा; गडचिरोली शहरातील ट्रॅफिक सिग्नल काही वेळासाठी राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-विदर्भातीलच नव्हे तर राज्याच्या विविध जिल्ह्यात उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. सकाळपासूनच उन्हाची तीव्रता वाढत चालल्याने जीवाची लाहीलाही होत आहे.अश्यातच शहरातील महत्त्वाच्या...

उष्णतेची तीव्रता; प्रखर उन्हामुळे शेतातच पडली बेशुद्ध.. – शेतकरी महिलेचा मृत्यू; नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात उष्णतेचा पारा चढल्याने आरोग्य विभागासह प्रशासन सतर्क झाले आहे.त्यातच,नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करत आहे.विशेष म्हणजे,दुपारी १२...

कहाणीमध्ये ट्विस्ट.! ना वाघ ना बिबट्या; घातपाताचा संशय.. – जंगल परिसरात महिलेचा मृतदेह आढळल्याचे प्रकरण..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर वनपरिक्षेत्राच्या हरदोली सहवनक्षेत्रातील ३३६ कक्ष क्रमांकाच्या सोनेगाव बीट एकमध्ये बिबट्याने मोहफुले वेचत असणाऱ्या महिलेच्या मानेवर हल्ला चढवून ठार केल्याची...

पोलिसांच्या एका चुकीमुळे गडचिरोली हत्या प्रकरणातील ‘त्या’ आरोपीस मिळाला जामीन..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सात वर्षावरील गुन्हे दाखल असलेल्या आरोपीस पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याला चोवीस तासांच्या आत न्यायालयातील न्याय दंडाधिकारी यांच्या समक्ष हजर करावे लागते.त्यानुसार,न्यायालय...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!