उद्रेक न्युज वृत्त
छत्रपती संभाजीनगर :- छत्रपती संभाजीनगरच्या फुलब्री तालुक्यातील सरपंच साबळे यांच्या आंदोलनाची दखल घेत पंचायत समितीच्या बीडीओंवर कारवाई करण्यात आली आहे.राज्याचे कॅबिनेटमंत्री गिरीश महाजन यांनी सरपंचांनी केलेल्या आंदोलनाची तात्काळ दखल घेत पंचायत समितीच्या बीडीओंना तात्काळ निलंबित केले आहे.
दरम्यान या प्रकरणी गेवराई पायगाचे सरपंच मंगेश साबळे म्हणाले की,हा निर्णय स्वागातार्ह आहे.मंत्री महाजन यांनी याप्रकरणाच्या चौकशीचे आदेशही दिले आहेत.मी उधळलेले पैसै मला वापस करावे अशी मागणीही यावेळी त्यांनी केली आहे.कारण हा सर्व पैसा माझ्या शेतकरी बांधवांच्या घामाचा पैसा आहे.
गेवराई पायगाचे सरपंच मंगेश साबळे म्हणाले की, माझ्या गावात विहिरीचे २० प्रस्ताव दाखल आहेत. या कामाला मंजुरी देण्यासाठी गटविकास अधिकारी १२ टक्के रक्कम मागत आहेत. बुधवारी कनिष्ठ अभियंता गायकवाड,ग्रामरोजगार सेविकासोबत गटविकास अधिकारी यांची भेट घेतली.तेव्हा मी आणलेले १ लाख रुपये न घेता मला कार्यालयाबाहेर जाण्यास सांगितले.त्यानंतर माझ्याकडे कनिष्ठ अभियंता आणि रोजगार सेवकाला पाठवून १२ टक्के प्रमाणे रक्कमेची मागणी करण्यात आली.यामुळे २ लाख रुपये घेऊन मी कार्यालयात आलो,पण या कर्मचाऱ्यांनी पैसे घेतले नाहीत,अशी माहिती मंगेश साबळे यांनी दिव्य मराठी ला दिली.