Friday, May 22, 2026
Homeअकोलाअखेर आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी पत्नीसह साळ्यावर गुन्हा दाखल... - तलाठी आत्महत्या...

अखेर आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी पत्नीसह साळ्यावर गुन्हा दाखल… – तलाठी आत्महत्या प्रकरण..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
अकोला :-अकोला जिल्ह्याच्या तेल्हारा तहसील कार्यालयांतर्गत कार्यरत असलेल्या तलाठ्याने व्हॉट्सॲपवर स्टेटस ठेवत एमआयडीसी परिसरातील झाडाला गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली असल्याची घटना रविवारी ३० मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती.तलाठ्याने व्हॉटसअपवर स्टेटस ठेवत आत्महत्येचे कारण स्पष्टपणे लिहिले होते.शिलानंद माणिकराव तेलगोटे वय ३९ वर्षे,रा.तेल्हारा,शाहूनगर,गाडेगाव रोड,तेल्हारा असे आत्महत्या केलेल्या तलाठ्याचे नाव आहे.
शिलानंद तेलगोटे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी व्हॉटसअपवर स्टेटस ठेवले होते.यात ‘मी श्री.शिलानंद माणिकराव तेलगोटे (वय ३९ वर्षे,रा.तेल्हारा, शाहूनगर,गाडेगाव रोड, तेल्हारा).मी दिनांक ३०/०३/२०२५ रोजी आत्महत्या करत आहे.माझ्या मृत्यूला जबाबदार माझी पत्नी प्रतिभा तेलगोटे ही असून ती मला खूप माझ्या मुलासमोर अश्लील शिव्या देते आणि मला वारंवार फाशी घे असे सांगते.माझे पैसे तिचा भाऊ श्री.प्रवीण गायगोळ असून,त्यांना शेतीसाठी मी काही रक्कम दिली होती.सदर रक्कम मी तलाठी सोसायटी कडून काढली असून त्याचं व्याजासह रक्कम देणे अपेक्षित आहे.कारण माझ्या पगारामधून ती रक्कम कट होत आहे.माझा मृत्यू झाल्यास माझी शेवटची इच्छा आहे की,माझं पोस्टमार्टम होईल,तेव्हा माझा चेहरा माझ्या पत्नीला दाखवू नये.कारण आज मी पाच दिवस झाले,जेवण केलेलं नाही.माझ्या पत्नीला सोडून कोणीही पाहिलं तरी चालेल.असे शिलानंद तेलगोटे यांनी स्टेटसवर म्हटले होते.
तलाठी शीलानंद माणिकराव तेलगोटे यांनी आत्महत्या केल्यानंतर त्यांच्या सुसाइड नोटच्या आधारे पत्नी प्रतिभा तेलगोटे वय ३४ वर्षे आणि साळा प्रवीण गायगोळ वय २६ वर्षे यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सुसाइड नोटमध्ये मृताने पत्नीविषयी उल्लेख केला असून, ‘माझ्या मृत्यूनंतर माझा चेहरा पत्नीला दाखवू नका, अंत्यविधी बहीण आशा बोदडे यांच्याकडे करावा,’ असे नमूद केले आहे.
तसेच, ‘पत्नीवर गुन्हा दाखल करू नये, ती स्वतः आत्मपरीक्षण करेल, पैशांपुढे नवरा आणि मुले नाहीत, फक्त पैसा हाच नातलग आहे,’ असेही लिहिले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

तब्बल ४३४ रिक्त पदांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन.. – पदांनुसार मासिक वेतन मिळणार १६ हजार रुपयांपासून ते ५० हजार रुपयांपर्यंत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी तसेच उद्योगांना कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे या उद्देशाने जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता...

उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या बालकांना मिळणार राष्ट्रीय स्तरावरील गौरव.. प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-केंद्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत सन-२०२७ साठी दिल्या जाणाऱ्या ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’साठी अर्ज मागविण्यात आले आहेत.शिक्षण,कला,सांस्कृतिक कार्य,क्रीडा, नाविन्यपूर्ण शोध,सामाजिक...

अज्ञात वाहनाची दुचाकीला जोरदार धडक; एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्याच्या नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर आज,शुक्रवार २२ एप्रिल रोजी भीषण अपघाताची घटना दुपारच्या सुमारास उघडकीस आली.विरूध्द दिशेने भरधाव वेगात असलेल्या एका अज्ञात...

प्रलंबित बिल आणि नवीन काम देण्यासाठी दोन टक्के दराने मागितले ७० हजार.. -जलसंपदा विभागातील अधीक्षक अभियंता एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कामाचे प्रलंबित असलेले बिल काढून देण्यासाठी व नवीन काही कामे तुम्हालाच देणार म्हणून दोन टक्के प्रमाणे ७० हजाराची लाचेची मागणी करणाऱ्या जलसंपदा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!