उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- अखिल भारतीय रणरागिणी साहित्यकुंजच्या वतीने एकदिवसीय पुरस्कार सोहळा व महाकवी संमेलन नुकतेच वर्धा येथे पार पडले. मणिपूर मध्ये घडलेल्या घटनेच्या पार्शवभूमीवर रणरागिणी मंचाने ऑनलाईन काव्यस्पर्धा आयोजीत केली होती.सदर स्पर्धेत अमेरिका,आफ्रिका,इंग्लंड देशासह कर्नाटक,मध्यप्रदेश,गोवा तसेच संपूर्ण महाराष्ट्रातून साहित्यिकांना भाग घेतला.मंचाच्या अध्यक्षा संगीता बढे,वर्धा,संयोजिका किरण चौधरी गडचिरोली ह्यांनी आयोजन केले होते.स्पर्धेत देसाईगंज वडसाचे सध्या गडचिरोलीत वास्तव्यास असणारे मिलिंद बी.खोब्रागडे यांनी तृतीय क्रमांक पटकाविला यांना वर्धेत नुकतेच पार पडलेल्या साहित्य संमेलनात पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले.
अनेक पुरस्काराचे मानकरी असलेले मिलिंद बी.खोब्रागडे हे सामाजिक जाणिवेचे कवी,लेखक म्हणून त्यांची ख्याती आहे.कविता,लेख,कथा तसेच “माझी लेखणी” हा त्यांचा सुविचार प्रसिद्ध आहे. त्यांना अनेक राष्ट्रीय व राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेत सर्वोत्कृष्ट,उत्कृष्ट,प्रथम,द्वितीय,तृतीय उत्तेजनार्थ,भावस्पर्शी क्रमांकाने गौरविण्यात आलेले आहे.दिनांक- १ ऑक्टोंबर२०२३ ला वर्धेत जागतिक स्तरावर पार पडलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात पुरस्कार प्रदान करण्यात आला.
संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक आचार्य ना.गो.थुटे उद्घाटक म्हणून तर उद्योजिका अर्चना इंगोले संमेलनाध्यक्ष म्हणून तर फिल्म प्रोड्युसर गोपीचंद मते,चंद्रपूरचे गझलकार सुनील बावणे तसेच अनेक राज्यभरातून आलेले ज्येष्ठ साहित्यिक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.सर्वांनी मिलिंद बी.खोब्रागडे यांना यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांच्या चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.