Thursday, September 3, 2026
Homeनागपूरअकरावीतील विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार; सात महिन्यांची गर्भवती.. - २१ वर्षीय तरुणास बेड्या..

अकरावीतील विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार; सात महिन्यांची गर्भवती.. – २१ वर्षीय तरुणास बेड्या..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-एकाच परिसरात राहत असलेल्या २१ वर्षीय तरुणाची इयत्ता अकरावीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीशी ओळख झाली.काही दिवसांत ओळखीचे रूपांतर जवळीकतेत झाले.त्यातूनच त्याने तिच्याशी शरीरसंबंध प्रस्तापित केले.शरीरसंबंधामुळे तिला गर्भधारणा झाली व ती सध्या सात महिन्यांची गर्भवती राहिल्याने याबाबत घरच्यांना माहिती झाली.प्रकरणी घरच्यांनी पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवताच पोलिसांनी तरुणावर गुन्हा दाखल करून अटक केल्याची घटना नागपूर जिल्ह्याच्या कोंढाळी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मरकसूर येथे घडली.सुभाषकुमार शुभमलाल कनोजिया वय २१ वर्षे,रा.मिर्चाघरी,जि.सोनभद्र,उत्तर प्रदेश असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
पीडित विद्यार्थिनी मूळची रामटेक तालुक्यातील महादुला येथील रहिवासी असून अलीकडे काटोल तालुक्याच्या मरकसूर येथे राहते आणि काटोल तालुक्यातीलच मेटपांजरा येथील शाळेत इयत्ता अकरावीत शिक्षण घेत आहे.सुभाषकुमार हा कामगार म्हणून काम करतो व याच परिसरातील सोनमोह येथे राहतो.मध्यंतरी त्या दोघांची आपसात ओळख झाली.त्यातूनच त्याने तिच्याशी शरीरसंबंध प्रस्तापित केले.त्यामुळे तिला गर्भधारणा झाली आणि प्रकरण पोलिसात पोहोचले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जनगणनेत ओबीसींचा स्वतंत्र कॉलम नसल्यास देशव्यापी आंदोलनाचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आगामी जनगणनेमध्ये इतर मागासवर्गीय(OBC)समाजाची स्वतंत्रपणे नोंद होण्यासाठी स्वतंत्र कॉलम उपलब्ध करून द्यावा,अशी मागणी ओबीसी समाज संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.यासंदर्भात संघटनेने देशाचे...

जिल्हा परिषद पदभरती; १९२ उमेदवारांची अंतिम प्रतीक्षा सूची जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत गट-क व गट-ड मधील रिक्त असलेली विविध संवर्गांची पदे अनुसूचित क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या उमेदवारांमधून शैक्षणिक अर्हता व...

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी ऑनलाईन प्रवेशिका आमंत्रित.. – हौशी मराठी,हिंदी,संगीत,संस्कृत तसेच बालनाट्य व दिव्यांग बाल नाट्य स्पर्धांचा समावेश..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने १६ नोव्हेंबर २०२६ पासून सुरु होणाऱ्या हौशी मराठी,हिंदी,संगीत व संस्कृत राज्य नाट्य स्पर्धांसाठी तसेच बालनाट्य स्पर्धा...

फिरत असतांनाच हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-प्रकृती निरोगी राहण्यासाठी नियमित सकाळी फिरायला जाणे व जिम करणे,अशी दिनचर्या सुरू केलेली असतांनाच घराबाहेर पडलेल्या एका अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!