Monday, June 29, 2026
Homeनागपूर७८ वर्षीय आजोबा ३० वर्षीय विवाहितेच्या प्रेमात.. -प्रेमात अडसर ठरणाऱ्या पतीचा आजोबाने...

७८ वर्षीय आजोबा ३० वर्षीय विवाहितेच्या प्रेमात.. -प्रेमात अडसर ठरणाऱ्या पतीचा आजोबाने काढला काटा..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-जिल्ह्याच्या गायमुख पर्यटनस्थळासाठी प्रसिद्ध असलेल्या नरखेड तालुक्यात अजब प्रेमाची गजब धक्कादायक कहाणी उघडकीस आल्याने सर्वत्र चर्चेचा विषय ठरू लागला आहे.विशेष म्हणजे,नातू-पतू,सून बोवा असलेल्या एका ७८ वर्षीय आजोबाने प्रेमात अडसर ठरणाऱ्या ३० वर्षीय प्रेमिकाच्या ३४ वर्षीय पतीचा काटा काढण्याचे ठरवून शेतशिवारात दुपट्ट्याने गळा आवळून खून केला असल्याची घटना काल मंगळवारी नरखेड पोलीस तपासात उघडकीस आली आहे.प्रकरणात आजोबा प्रियकर व तरुण प्रेयसीला नरखेड पोलिसांनी अटक करून भारतीय न्याय संहिता (बीएनएस)कलम १०३(१),३(५) अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.शिवशंकर गणुजी धुर्वे वय ३४ वर्षे असे मृताचे नाव आहे.तर आरोपींमध्ये शांताराम पुरणसिंग दिदावत वय ७८ वर्षे व त्याची प्रेयसी म्हणजेच शिवशंकरच्या ३० वर्षीय पत्नीचा समावेश आहे.हे तिघेही रा.बेलोना,ता. नरखेड,जि.नागपूर येथील रहिवासी आहेत.
अधिक माहिती अशी की, ७८ वर्षीय आजोबा आरोपी शांताराम दिदावत हा भाजप पदाधिकारी उकेश चव्हाण यांच्याकडे दिवाणजी म्हणून,तर शिवशंकर धुर्वे सालगडी म्हणून काम करायचा.शिवशंकर त्याच्या पत्नीसोबत उकेश चव्हाण यांच्या गंगालडोह शिवारातील शेतात राहायचा.दोघेही एकाच मालकाकडे कामाला असल्याने त्यांची आपसात ओळख होती.त्यातच शांताराम व शिवशंकरच्या पत्नीचे आपसात सूत जुळले.दोघेही शरीरसंबंध करीत असतांना शिवशंकरने चारदा प्रत्यक्ष बघितले होते.तो आपल्या प्रेमात अडसर ठरत असल्याचे शांतारामला वाटत असल्याने त्याने शिवशंकरला संपविण्याची योजना आखली.त्यानुसार शांतारामने रविवारी शिवशंकरला गायमुख शिवारातील शेतात नांगरणी करण्यासाठी पाठविले.भाजप पदाधिकारी उकेश चव्हाण यांची गायमुख (ता.नरखेड) शिवारात शेती आहे.दुपारी शिवशंकरची पत्नी त्याच्या जेवणाचा डब्बा घेऊन शेतात गेली.तिच्या मागे शांताराम शेतात पोहोचला.त्याने शिवशंकरचा दुपट्ट्याने गळा आवळून खून केला व घरी परत आला.त्यानंतर त्याने मयूर बावणे यास शिवशंकर शेतात दारू पिऊन पडून असेल.त्याला बैलगाडीत टाकून घेऊन ये,अशी सूचना केली.त्यानुसार मयूर बावणे शेतात गेला असता शिवशंकर हा निपचित पडून होता.घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नरखेड शहरातील ग्रामीण रुग्णालयात दाखल केला. त्याचा मृत्यू गुदमरून झाल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट होताच पोलिसांनी गावात चौकशी सुरू केली.त्यांना आरोपी आजोबा आणि विवाहित तरुणी या दोघांची प्रेमकथा कळताच त्यांनी दोघांना ताब्यात घेतले व अवघ्या दोनच दिवसांत हत्येचे बिंग फुटले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उद्यापासून ८ लाख २८ हजार ९०४ मतदारांची होणार पडताळणी; बीएलओंकडून घरोघरी सर्वेक्षण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार गडचिरोली जिल्ह्यात "मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम-२०२६" प्रभावी व पारदर्शक पद्धतीने राबविण्यात येत आहे.या कार्यक्रमाच्या अंमलबजावणी...

यंदाही मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षातर्फे वारकऱ्यांसाठी ‘चरण सेवा’ उपक्रम.. – ३ हजार लिटर आयुर्वेदिक तेलाद्वारे करण्यात येणार मालिश..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपूरकडे पायी मार्गस्थ होणाऱ्या लाखो वारकऱ्यांच्या सेवेसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षातर्फे 'चरण सेवा' उपक्रम...

उद्याला शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमध्ये जल्लोषात शाळा प्रवेशोत्सव.. – पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तके,गणवेश व शालेय साहित्यांच्या वितरणाचे नियोजन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, भामरागड अंतर्गत कार्यरत ८ शासकीय व १६ अनुदानित आश्रमशाळांमध्ये उद्या,मंगळवार ३० जून २०२६ रोजी शाळा प्रवेशोत्सव उत्साहात...

संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात १५ दिवस जमावबंदी आदेश लागू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात आज,सोमवार २९ जून ते १३ जुलै २०२६ या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!