Tuesday, September 8, 2026
Homeनागपूर२० वर्षीय तरुणाचा १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; तरुणाला बेड्या..

२० वर्षीय तरुणाचा १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; तरुणाला बेड्या..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या एका २० वर्षीय तरुणाने १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाचे खोटे आमिष दाखवले व नंतर वारंवार शारीरिक अत्याचार केल्याने यात ती गर्भवती राहिल्याचा धक्कादायक प्रकार नागपूरच्या मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला आहे.प्रकरणी पोलिसांनी २० वर्षीय विवान खांडेकर  रा.मानकापूर, नागपूर यास बेड्या ठोकल्या आहेत.
विवान खांडेकर हा पूर्वीपासूनच गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे.त्याच्यावर यापूर्वी मारपीट करण्याचे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.प्रकरणातील पीडिता व आरोपी विवान यांची ओळख ती इयत्ता ९ वीत शिक्षण घेत असतांनाच झाली होती.त्यावेळेस त्यांच्यात साधी मैत्री होती.मात्र,हळूहळू या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले.सध्या ही पीडित मुलगी इयत्ता १२ वीत शिकते.आरोपीने तब्बल तीन वर्षे लग्नाचे आमिष दाखवून मुलीच्या घरी कुणीही नसतांना राहत्या घरीच तिच्यावर वारंवार शारीरिक अत्याचार केले.एवढेच नव्हे तर,त्याने तिला गोरेवाडा परिसरातील एका  हॉटेलमध्ये नेऊनही तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.अश्यातच गेल्या काही दिवसांपासून पीडित मुलीची प्रकृती अचानक बिघडली.तिची शारीरिक स्थिती खालावत चालल्याने कुटुंबीयांना संशय आला. त्यांनी तातडीने तिला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेले.तिथे डॉक्टरांनी तिची तपासणी केली असता,ती गरोदर असल्याचे तपासात समोर आले. मुलीच्या पालकांनी तिला विश्वासात घेत विचारणा केली असता प्रकरणास वाचा फुटली.मुलीच्या पालकांनी क्षणाचाही विलंब न करता थेट मानकापूर पोलीस ठाणे गाठले आणि आरोपीविरोधात तक्रार नोंदवली.घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी भारतीय न्याय संहिता आणि पॉक्सो कायद्याच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.आरोपी गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असल्याने पोलीस अधिक सखोल तपास करीत आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शासकीय शुल्काव्यतिरिक अतिरिक्त रकमेची मागणी; केवळ १५० रुपये घेतांना सेतू केंद्र चालकाला रंगेहाथ पकडले..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-नागरिकांना वेळेत व तात्काळ शासकीय प्रमाणपत्रे मिळावीत,यासाठी ऑनलाईन सेतू केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.मात्र,काही सेतू केंद्र चालक मनमानी कारभार करून शासकीय...

गावाजवळच दर्जेदार शिक्षण; चार शाळा बनणार ‘मॉडेल शाळा’..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आदिवासीबहुल आणि दुर्गम एटापल्ली तालुक्यातील विद्यार्थ्यांना गावाजवळच आधुनिक, गुणवत्तापूर्ण आणि सर्वांगीण शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तालुक्यातील चार शाळा ‘मॉडेल शाळा’...

भरती परीक्षा सुधारणांसाठी उच्चस्तरीय टास्क फोर्स गठीत; राज्यातील सर्व सहा विभागांना देणार प्रत्यक्ष भेटी.. – थेट संवादासह आपल्या सूचना व अभिप्राय संबंधित विभागाच्या ई-मेलवर...

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक,विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ४ सप्टेंबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयान्वये उच्चस्तरीय टास्क फोर्स गठीत...

‘युजीसी-नेट’ परीक्षा केंद्राच्या दोनशे मीटर परिसरात मनाई आदेश जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राष्ट्रीय परीक्षा एजन्सी(NTA),नवी दिल्ली यांच्यामार्फत आयोजित 'विद्यापीठ अनुदान आयोग-राष्ट्रीय पात्रता परीक्षा'(UGC-NET)जून-२०२६ ची परीक्षा गडचिरोली येथील शासकीय विज्ञान महाविद्यालय,चामोर्शी रोड,कन्नमवार नगर येथे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!