Thursday, June 4, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्त१४ डिसेंबर पासून राज्यातील १७ लाख कर्मचारी जाणार बेमुदत संपावर…-जुनी पेन्शन मागणीचा...

१४ डिसेंबर पासून राज्यातील १७ लाख कर्मचारी जाणार बेमुदत संपावर…-जुनी पेन्शन मागणीचा पुन्हा गाजणार मुद्दा

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :- राज्य सरकारी कर्मचारी बऱ्याच वर्षापासून जुनी पेन्शन लागू करावी; या मागणीसाठी आंदोलन करीत आहेत.जुनी पेन्शन व इतर मागण्यांच्या अनुषंगाने माझे कुटुंब,माझी पेन्शन अंतर्गत जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या वतीने मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले.राज्यातील १७ लाख कर्मचारी मार्च महिन्यात सात दिवसांच्या संपावर गेले होते.शासनाने आर्थिक व सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी सेवानिवृत्त अधिकारी सुबोधकुमार यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून कर्मचाऱ्यांना आंदोलन मागे घेण्यास विनंती केली.आर्थिक व सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीला वारंवार मुदतवाढ दिल्याने व अद्यापही समितीचा अहवाल सादर न झाल्याने कर्मचारी नाराज आहेत.याकडे पुन्हा शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील १७ लाख कर्मचारी १४ डिसेंबरपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. यात जिल्ह्यातील कर्मचारीसुद्धा मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

यापूर्वी कर्मचान्यांनी मार्च महिन्यात बेमुदत संप पुकारला होता.मात्र, सरकारच्या आश्वास नानंतर संप मागे घेण्यात आला; पण सात महिन्यांचा कालावधी लोटूनही शासनाने यावर कुठलाच निर्णय घेतला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी १४ डिसेंबरपासून संपावर जाण्याचा इशारा दिला आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात मनाई आदेश लागू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मोहरम उत्सव तसेच माओवादी संघटनेच्या टी.सी.ओ.सी.(TCOC)कालावधीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम,१९५१ च्या कलम ३७...

भरधाव चारचाकी वाहनाची दुचाकीला धडक; तरुणाचा घटनास्थळीच मृत्यू,तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातच नव्हे तर सर्वत्र भीषण अपघाताच्या घटना मोठ्या प्रमाणावर उघडकीस येऊ लागल्या आहेत.आपण आपल्या साईडने जात असो वा कितीही नियंत्रित वाहन...

अन्न व औषध प्रशासन विभागाचा छापा; मोठा औषध साठा जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-कोणत्याही वैज्ञानिक आधाराशिवाय खोटे दावे करणे आणि जाहिरात करून औषध विकणे कायद्यानुसार गंभीर गुन्हा असूनही काहीजण आक्षेपार्ह जाहिराती तसेच निकृष्ट दर्जाची...

अल्पवयीन मुलांची प्रेयसीची हौस पुरवण्यासाठी लाखो रुपयांची चोरी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-दोन अल्पवयीन मुलांनी चक्क प्रेयसींची हौस पुरवण्यासाठी लाखो रुपयांची चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार पोलीस तपासात समोर आल्याने पोलिसही चक्रावून गेल्याची घटना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!