Tuesday, July 21, 2026
Homeनागपूरहोमगार्ड तरुणाचे टोकाचे पाऊल; दुपारी साक्षगांध अन् पहाटेच आत्महत्या; कारण गुलदस्त्यात..!

होमगार्ड तरुणाचे टोकाचे पाऊल; दुपारी साक्षगांध अन् पहाटेच आत्महत्या; कारण गुलदस्त्यात..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-होमगार्ड पदावर कार्यरत ३० वर्षीय तरुणाने टोकाचे पाऊल उचलले असल्याची घटना काल, गुरुवारी २७ मार्चला नरखेड तालुक्यातील जलालखेडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील खरबडी शिवारात घडली.महत्वाचे म्हणजे,सदर होमगार्ड असलेल्या तरुणाचे नुकतेच लग्न जुळल्याने काल गुरुवारी दुपारी साक्षगंधाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.मात्र,त्याने पहाटेच शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याने आत्महत्येचे कारण अद्यापही गुलदस्त्यातच आहे.हर्षल मोतीराम राऊत वय ३० वर्षे, रा.खरबडी,ता.नरखेड, जि.नागपूर ग्रामीण असे आत्महत्या केलेल्या मृत तरुणाचे नाव आहे.
माहितीनुसार,हर्षल हा मागील काही वर्षांपासून जलालखेडा पोलिस ठाण्यात होमगार्ड पदावर कार्यरत होता.लग्न जुळल्याने काल गुरुवारी दुपारी साक्षगंधाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्याअनुषंगाने त्याने बुधवारी २६ मार्च रोजी कार्यक्रमाची पूर्वतयारी देखील केली होती.दरम्यान,काल गुरुवारी तो पहाटे ४ वाजेच्या सुमारास शेतात गेला होता.हर्षल घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी सकाळी ५.३० वाजेच्या सुमारास शेतात जाऊन त्याचा शोध घेतला.शेतातील विहिरीच्या काठावर त्याच्या चपला आढळून आल्याने त्यांना संशय आला. त्याने विहिरीत उडी घेतल्याचे स्पष्ट होताच पोलिसांना सूचना देण्यात आली.पोलिसांनी घटनास्थळ गाठून विहिरीतून मृतदेह काढला व पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जलालखेडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेला. प्रकरणी जलालखेडा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.
हर्षलकडे वडिलोपार्जित शेती जमीन होती.त्यातच
 इतरांची शेती ठेक्याने करायचा.त्याचे यापूर्वीही एकदा लग्न जुळले होते.परंतु,साक्षगंध होण्यापूर्वीच मोडले होते.त्यानंतर आता पुन्हा लग्न जुळले आणि त्याने टोकाचे पाऊल उचलले.त्यामुळे त्याची आत्महत्या ही गावात चर्चेचा विषय ठरू लागली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आंधळी येथे मोफत नेत्रसेवा शिबिर संपन्न; ११७ जणांची तपासणी,तर ३२ रुग्णांवर होणार मोफत शस्त्रक्रिया..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार नेत्रसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महात्मे आय बँक हॉस्पिटल नागपूर,समता फाउंडेशन मुंबई,आधार ग्रामीण विकास संस्था आंधळी आणि गट...

सोनम वांगचुक समर्थनाथ कुरखेड्यात रिपाईच्या वतीने निदर्शने व निवेदन सादर..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-परीक्षांच्या नावाखाली विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणे सुरू झाले आहे. रात्रंदिवस मेहनत घेऊन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना काही दिवसांतच कळतेय की अगोदरच पेपरची कॉपी...

डीएपी खताच्या जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम; शेतकऱ्यांनी पिकांच्या गरजेनुसार पर्यायी खतांचा वापर करण्याचे आवाहन.. -प्रत्यक्ष खताच्या गोणीवरील छापील किंमत पाहूनच खत खरेदी करावे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-डीएपी खताच्या जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम झाल्याने राज्यासह गडचिरोली जिल्ह्यातही डीएपी खताचा पुरवठा अपेक्षेप्रमाणे होत नसल्याने शेतकऱ्यांनी पिकांच्या गरजेनुसार पर्यायी खतांचा...

नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन..पुढील चोवीस तास महत्वाचे; चार जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र राज्यातील विविध भागात पावसाने जोरदार हजेरी लावल्याचे चित्र आहे. हवामान विभागाने नुकतेच १९ जुलै ते २३ जुलै दरम्यान पाच दिवसांसाठी जोरदार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!