Wednesday, September 23, 2026
Homeनागभिडहायवा ट्रकचा हूक टेम्पोला अडकला; टेम्पो उलटला - ३० मजूर जखमी तर...

हायवा ट्रकचा हूक टेम्पोला अडकला; टेम्पो उलटला – ३० मजूर जखमी तर एक ठार…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागभीड(चंद्रपूर) :-मजुरांना घेऊन जाणाऱ्या टेम्पोचा काल, मंगळवारी १ ऑक्टोंबरच्या सकाळी ९:३० वाजता अपघात झाल्याने एक महिला ठार तर ३० मजूर महिला जखमी झाल्या.यातील चौघींची प्रकृती गंभीर असून,पवनी (भंडारा) येथे उपचारासाठी हलविण्यात आले.गायत्री रोशन हेमणे वय ३३ वर्षे,रा.डोंगरवार असे मृतक महिलेचे नाव आहे.
नागभीड तालुक्यातील नागभीड,पेंढरी,कसर्ला डोंगरगाव येथील मजूर नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यात सोयाबीन काढण्याच्या मजुरीला जात होते. मजुरांची ने-आण करण्यासाठी वाहनाची सोय करण्यात आली होती.
दररोजप्रमाणे ३५ मजुरांचा समूह एम.एच.३४ बीजी १७२० क्रमांकाच्या टेम्पोने भिवापूरकडे जात होता. दरम्यान,कांपाजवळ नागपूरकडून येणाऱ्या हायवा ट्रकचा हूक टेम्पोला अडकला.त्यामुळे टेम्पो उलटून ३५ मजूर जखमी झाले.गंभीर जखमी झालेल्या गायत्री हेमणे या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.
सुषमा हजारे,शशिकला धनविजय,शकुंतला ढोक, रेखा नन्नावरे,मंगला बागडे,गोपाल नक्षिने,ज्योती नक्षिने,रुख्मावती गजभे,संगीता श्रीरामे,राजू कामडी, विलास मंडपे,विनोदा मंडपे,कांता माटे,ममता शेरकुरे, मीरा पाथोडे,मनीषा नन्नावरे,तनुजा हेमणे,कांता मेश्राम, दुर्गा शेरकुरे,सुमित्रा वुईके,माया मेश्राम,वैजंता रामटेके, सुनंदा रामटेके,जनाबाई पाथोडे,कमला जांभुळे, बेबी श्रीरामे,शारदा हेमणे यांचा जखमींमध्ये समावेश आहे.सर्व जखमींना भंडारा जिल्ह्यातील भुयार प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.तनुजा भेंडारकर, जिजा हेमणे,मीना हेमणे यांची प्रकृती गंभीर असल्याने पवनी येथे हलविण्यात आले. जखमींवर वैद्यकीय अधिकारी डॉ.आदित्य कानडे, परिचारिका रुक्षणा मेश्राम,चुनौती देशमुख उपचार करीत आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

भरधाव वाहनाच्या धडकेत वाघिणीचा मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-एका अज्ञात वाहनाने जंगल परिसरातून मार्गक्रमण करीत महामार्ग ओलांडणाऱ्या वाघिणीला जोरदार धडक दिल्याने धडकेत वाघिणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज,मंगळवार २२...

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकांचा बिगुल वाजला.. -शिक्षक-पदवीधर मतदार संघात कोण मारणार बाजी?

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकांचा बिगुल आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी निवडणूक आयोगाने जाहीर केला.त्यानुसार,तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीची अधिकृत घोषणा करण्यात...

जन सेवेतुनच खरी इश्वराची आराधना-किशन नागदेवे -साई मंदिर देवस्थान समितीच्या उपक्रमातून तब्बल २ हजार ५०० रुग्णांची मोफत तपासणी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज येथील राजेंद्र  वार्डातील प्रसिद्ध साई मंदिर देवस्थान समितीच्या वतीने आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी गणेशोत्सव निमित्त  मोफत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आला.या...

‘लोकसंवाद-२०२६’मधून रक्तदान व रक्तसुरक्षिततेविषयी विशेष जनजागृती कार्यक्रम संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गणेशोत्सवानिमित्त माहिती व जनसंपर्क विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या ‘लोकसंवाद- २०२६’ उपक्रमांतर्गत आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात रक्तदान व रक्तसुरक्षिततेविषयी विशेष...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!