Tuesday, July 7, 2026
Homeदेसाईगंजहागणदारी मुक्त गावातच उघड्यावर शौचास-घरी शौचालय असुनही डब्बा पार्टी

हागणदारी मुक्त गावातच उघड्यावर शौचास-घरी शौचालय असुनही डब्बा पार्टी

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

देसाईगंज :-शासन स्तरावरून विविध प्रकारच्या योजना शौचालय बांधकामासाठी आखल्या जातात.लाखो व कोट्यवधी रुपये या योजनांवर खर्च केल्या जाते.जेणेकरून कुणीही उघड्यावर शौचास बसु नये.यामध्ये रोजगार हमी योजने अंतर्गत सुरुवातीपासूनच शौचालय बांधकामे हाती घेण्यात आली तसेच हल्ली स्वच्छ भारत मिशनच्या माध्यमातून घरोघरी शौचालय बांधकामे ज्यांच्याकडे शौचालय नाही अशांना शौचालये बांधुन देण्यात आले.

तरीसुध्दा देसाईगंज तालुक्यातील नव्हे तर इतरही तालुक्यातील ग्रामीण भागातील तरुण मंडळी,वयोवृद्ध,स्त्रीया,पुरुष मंडळी व लहाण्यांपासून तर थोरांपर्यंतची मंडळी घरी शौचालय असूनही उघड्यावर शौचास जातात.कित्तेक ग्रामपंचायतीला जिल्हा परिषदे कडून स्वच्छ व हागणदारीमुक्त गाव म्हणून गौरविले गेले आहे.तरी उघड्यावर शौचास बसणार्ऱ्यांचे प्रमाण वाढलेले दिसून येते.

सकाळच्या सुमारास पहाटे व रात्रोच्या सुमारास एकास सोबत घेऊन वा गट तयार करून व हातात डब्बा घेऊन,गावातील बाह्य रस्त्यांवर व मुख्य रस्त्यांवर शौचास करणाऱ्यांचे प्रमाण वाढलेले आहे.ग्रामपंचायती अंतर्गत दंडात्मक कारवाईचे त्या ठिकाणी भले मोठे फलक लावले गेले असूनही,त्याला न जुमानता उघड्यावर शौचास बसले जात आहे.

  यासाठी कुणीही उघड्यावर शौचास बसणार नाही याकरिता ग्रामपंचायत पदाधिकारीच नाही तर गावकऱ्यांनी मिळून  ठोस पावले उचलणे गरजेचे आहे जेणेकरून डब्बा पार्टीला आळा बसेल आणि स्वच्छ व हागणदारी मुक्त गाव होण्यास मदत होईल.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाघांचे हल्ले काही केल्या थांबेना..! ऐन शेतीच्या हंगामातच वाघाने घेतला एकाचा जीव..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या चिमूर तालुक्यातील खडसंगी (बफर)वनपरिक्षेत्र व प्रादेशिक वनक्षेत्राच्या सीमेलगतच्या बरडघाट शेतशिवारात वाघाने एका ५० वर्षीय शेतकऱ्यावर हल्ला चढवून जीव घेतल्याची घटना...

कृषी विभागामार्फत खरीप हंगाम-२०२६ साठी पीकस्पर्धेचे आयोजन.. – स्पर्धेतील विजेत्यांना तालुका,जिल्हा आणि राज्यस्तरावर प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांकाची बक्षिसे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील अन्नधान्य,कडधान्य व गळीतधान्य पिकांची उत्पादकता वाढविणे,प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे तसेच आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने कृषी विभागामार्फत खरीप हंगाम...

उद्यापासून गडचिरोली,आरमोरी व देसाईगंज येथे जादूटोणा विरोधी कायदा व अंधश्रद्धा निर्मूलनावर प्रबोधन कार्यक्रम..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जादूटोणा विरोधी कायदा तसेच अंधश्रद्धा निर्मूलनाबाबत समाजामध्ये जनजागृती व प्रबोधन व्हावे,या उद्देशाने गडचिरोली जिल्ह्यात विशेष प्रबोधन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.या...

संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात १५ दिवस मनाई आदेश लागू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम,१९५१ मधील कलम ३७(१)(३)अन्वये ५ जुलै २०२६ रोजी रात्री १२.०१ वाजल्यापासून ते १९...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!