- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गोंदिया :-कुठल्याही प्रकारची पूर्वसूचना वा पदमुक्त न करता आपल्याच मनमर्जीने ठराव घेऊन दुसरा ग्रामरोजगार सेवक नियुक्त करण्याची जाहिरात काढणे ग्रामपंचायतीचे ग्राम विकास अधिकारी आणि सरपंच यांना चांगलेच भोवले आहे.नियमांना बगल देत ‘हम करे सो कायदा’ म्हणत गावातील ग्राम रोजगार सेवकाला पदमुक्त न करता सरळ दुसरा रोजगार सेवक नेमण्याची जाहिरात काढली.ग्राम सभेच्या ठरावात ग्राम रोजगार सेवकाला काढल्याचे नमूद करून नवीन पदभरती घेण्याचा गोरखधंदा पदाधिकाऱ्यांनी चालविला.हा सर्व प्रकार सालेकसा पंचायत समिती अंतर्गत कारूटोला ग्रामपंचायत सरपंच व ग्राम विकास अधिकारी यांच्या संगनमताने झाल्याने परिणामी त्यांच्या या अजब कार्याला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने चांगलीच चपराक दिली आहे.
कारूटोला ग्रामपंचायत येथील ग्रामरोजगार सेवक पुस्तकला देवेंद्र मुनेश्वर यांची रोजगार सेवक म्हणून सन २०१७ ला सर्वांनुमते निवड करून ठरावानुसार नियुक्ती करण्यात आली.राजकीय हेवेदावे करणाऱ्या सरपंच व ग्रामसेवकाने १ ऑक्टोंबर २०२४ रोजी रोजगार सेवकाला काढून टाकल्याचा ठराव घेतला. पदमुक्त केल्याची माहिती ग्राम रोजगार सेवकाला न होऊ देता दुसरा रोजगार सेवक निवडण्याची जाहिरात ग्रामसेवकाने काढली.त्यानंतर ग्राम रोजगार सेवक पुस्तकला मुनेश्वर यांनी पदावरून काढून टाकल्याच्या ठरावाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रीट याचिका क्रमांक ७४०५/ २०२४ नुसार आव्हान दिले.न्यायालयाने याचिकाकर्त्याचे म्हणणे ऐकून घेऊन प्रतिवादीला नोटीस बजावून ती नियुक्ती न्यायालयाच्या अंतिम न्याय निर्णयावर अवलंबून असेल,असे स्पष्ट केले.
कारुटोला ग्रामपंचायतचे ग्राम अधिकाऱ्यांनी रोजगार सेवक पुस्तकला मुनेश्वर यांना पदमुक्त केल्याचे कोणतेही पत्र किंवा ठराव दिला नाही.ग्रामपंचायतने घेतलेला ठराव पंचायत समितीलादेखील पाठविलेला नाही.जुन्या रोजगार सेवकाला पदमुक्त केल्याशिवाय नवीन पदभरती करता येत नसतांनाही ग्राम विकास अधिकाऱ्याने ग्राम रोजगार सेवकाची नवीन पदभरतीसाठी जाहिरात काढली.
कारुटोला,हेटीटोला,सलंगटोला,दा गोटोला,चिचटोला, तेलीटोला व तुमडीटोला अशा सात गावांची मिळून कारूटोला ही गट ग्रामपंचायत आहे.नवीन रोजगार सेवकाची नियुक्त्ती जरी करायची असेल तर सहा गावांचे अर्ज घेणे अपेक्षित होते.मात्र,ग्राम विकास अधिकाऱ्याने फक्त हेटीटोला,सलंगटोला,दागोटोला या तीनच गावातील लोकांचे अर्ज स्वीकारले असल्याने नियमांना बगल देण्याचा प्रयत्न केला असल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
- Advertisement -

