- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-आदिवासी उमेदवांराकरीता कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र गडचिरोलीच्या वतीने जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या उमेदवांराकरीता एमपीएससी(MPSC) पुर्व प्रशिक्षण, जिल्हा निवड समीतीच्या विविध पदभरती बाबत तसेच IBPS,SSC च्या परीक्षा बाबत स्पर्धा पुर्व प्रशिक्षण कार्यक्रम विनामुल्य राबविण्यात येत आहे.सदर प्रशिक्षण घेऊ इच्छीणाऱ्या उमेदवांराकडे शालांत परीक्षा उतीर्ण प्रमाणपत्र व रोजगार नोदंणी कार्ड(EMPLOYMENT CARD)असणे आवश्यक आहे.प्रशिक्षणाचा कालावधी साडेतीन महीने आहे.प्रशिक्षणा दरम्यान १ हजार रुपये दरमहा विद्यावेतन दिले जाईल.प्रशिक्षण पुर्ण करणाऱ्या उमेदवांराना चार पुस्तकांचा संच व प्रमाणपत्र देण्यात येते.कार्यालयात अर्ज विनामुल्य उपलब्ध आहेत.तसेच अर्ज १ नोव्हेंबर २०२५ पासुन ते २७ नोव्हेंबर २०२५ पर्यत कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,गडचिरोली कार्यालयात सादर करावेत.मुलाखत २८ नोव्हेंबर २०२५ रोजी आदिवासी उमेदवांराकरीता कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र,शासकीय संकुल बॅरेक क्र.२ गडचिरोली येथे घेण्यात येणार आहे, त्याकरीता उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी 8485814488 या क्रमाकांवर संपर्क साधावा,असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी यांनी केले आहे.
- Advertisement -

