Friday, May 1, 2026
Homeगडचिरोलीरेतीघाट घ्यायचेय तर करा ऑनलाईन अर्ज.. उद्यापासून २१ रेतीघाटांसाठी ई-निविदा व ई-लिलाव...

रेतीघाट घ्यायचेय तर करा ऑनलाईन अर्ज.. उद्यापासून २१ रेतीघाटांसाठी ई-निविदा व ई-लिलाव प्रक्रिया सुरू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या खनिज शाखेतर्फे सन २०२५-२०२६ या वर्षाकरिता जिल्ह्यातील एकूण २१ वाळूगट/रेतीघाटांसाठी ई-निविदा व ई-लिलाव सूचना जाहीर करण्यात आली आहे.वाळू/रेती धोरण-२०२५ नुसार आणि राज्यस्तरीय पर्यावरण प्राधिकरणाच्या अनुमतीस अधीन राहून हा प्रथम लिलाव आयोजित करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी आज कळविले आहे.
  • निविदा वेळापत्रक👇
ई-निविदा ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्याची प्रक्रिया उद्या,बुधवार २९ ऑक्टोंबर २०२५ पासून सुरु होईल. इच्छुक रेतीघाट निविदा/बोलीधारकांसाठी ३० ऑक्टोंबर २०२५ रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन/वेबिनारद्वारे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. ऑनलाईन ई-निविदा(ई-टेंडर)स्वीकारणे पुढील महिन्याच्या ११ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १ वाजता बंद होईल. तांत्रिक लिफाफा १२ नोव्हेंबर २०२५ रोजी उघडण्यात येईल,तर तांत्रिक पडताळणीनंतर आर्थिक लिफाफा उघडण्यात येईल.अंतिम ई-लिलाव(ई-ऑक्शन)प्रक्रिया १३ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजल्यापासून दुपारी २ वाजेपर्यंत सुरु राहील,त्यानंतर लिलावाची उच्चतम बोली जाहीर करण्यात येईल.निविदा दस्तावेज, आवश्यक सूचना,अटी व शर्तींचा तपशील http://mahatenders.gov.inhttp://www.gadchiroli.nic.in या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे.
  • उपविभागनिहाय रेतीघाटाचा तपशील👇
जिल्ह्यातील एकूण २१ रेतीघाटांमध्ये १ लाख ४ हजार ३८२ ब्रास वाळू उपलब्ध आहे.यासाठी प्रती ब्रास ६००/-रुपये प्रमाणे ९० टक्के परिमाणाची एकूण किंमत (Upset Price)५ कोटी ६३ लाख ६६ हजार २८० रुपये निश्चित करण्यात आली आहे.या लिलावात उपविभागनिहाय उपलब्ध परिमाणानुसार वार्षिक उलाढाल बंधनकारक राहील.
गडचिरोली उपविभागामध्ये एकूण ४ वाळू घाटांचा समावेश आहे,ज्यात १९ हजार ८५८ ब्रास वाळू उपलब्ध आहे आणि यासाठी ३ कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल बंधनकारक आहे.
देसाईगंज उपविभागामध्ये एकूण ४ वाळू घाटांचा समावेश असून २२ हजार २८० ब्रास वाळू उपलब्ध आहे,यासाठी ४ कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल बंधनकारक आहे.
अहेरी उपविभागामध्ये सर्वाधिक ११ वाळू घाट असून ५६ हजार ३०८ ब्रास वाळू उपलब्ध आहे,ज्यासाठी ५ कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल बंधनकारक आहे.
कुरखेडा उपविभागामध्ये २ वाळू घाट असून ५ हजार ९३६ ब्रास वाळू उपलब्ध आहे,यासाठी १ कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल बंधनकारक आहे.
  • लिलावधारकांसाठी महत्वाच्या अटी👇
निविदेचा कालावधी १ वर्ष(३० सप्टेंबर २०२६ पर्यंत) असून वाळू उत्खननाचा कालावधी ९ जून २०२६ पर्यंत राहील.नदी/खाडी पात्रामधून वाळू निर्गतीसाठी पात्र लिलावधारकांनी उत्खनन केलेल्या वाळूच्या जास्तीत जास्त १० टक्के वाळू प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत तसेच आर्थिकदृष्ट्या मागासप्रवर्गातील लाभार्थ्यांच्या घरकुलांकरीता विनामूल्य उपलब्ध करून देणे बंधनकारक राहील.
लिलावापूर्वी वाळूसाठा,वाहतुकीसाठी आवश्यक रस्ते आणि वाळू मातीमिश्रीत आहे किंवा कसे?याची खात्री करण्याची जबाबदारी संबंधित लिलावधारकाची राहील.ताबा घेऊन उत्खनन केल्यानंतर यासंबंधीची कोणतीही तक्रार विचारात घेतली जाणार नाही,तसेच वाळूगट बदलून देण्याची किंवा जमा केलेली रक्कम परत करण्याच्या विनंतीचा विचार केला जाणार नाही, असे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी लिलावासाठी दिलेल्या जाहिरातीत नमूद असल्याचे जिल्हा खनीकर्म अधिकारी इम्रान शेख यांनी कळविले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

चक्क चोरट्यांनी खासदारांच्या शेतातील वीज मीटरसह मोटरपंप नेला चोरून.

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्यात चोरीच्या घटनांनी जोर धरलेला असतांनाच आता थेट लोकप्रतिनिधीही यातून सुटलेले नाहीत.भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ.प्रशांत पडोळे यांच्या वडिलोपार्जित शेतातून अज्ञात...

तब्बल २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; चंद्रपूर पोलिस अधीक्षक पदाची सूत्रे आता आयुष नोपानी यांच्याकडे..

उद्रेक न्युज वृत्त :-ऐन महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच आज,गुरुवार ३० एप्रिल रोजी राज्यातील तब्बल २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या(भारतीय पोलीस सेवा)बदल्या करण्यात आल्या आहेत.यात चंद्रपूरचे विद्यमान...

“आपण लोकांची कामे करण्यासाठी बसलो आहोत; अडवणूक करण्यासाठी नाही”.. -सहपालकमंत्र्यांकडून अधिकाऱ्यांची कानउघडणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे संपूर्ण मॅपिंग करून शासनाने स्वतः त्यांच्या दारात जाऊन गरजेनुसार योजनांचा लाभ द्यावा,अशी भूमिका कृषी राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष...

अखेर कुरखेडा नगरपंचायत सफाई कामगारांच्या बेमुदत संपावर तोडगा; संप मागे..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा नगरपंचायत अंतर्गत कार्यरत सफाई कामगारांंनी थकीत वेतनाकरीता मागील २३ एप्रीलपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले होते.त्यामुळे शहरातील स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!