Saturday, April 18, 2026
Homeदेसाईगंजस्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी वेळेचे योग्य व्यवस्थापन हवे- आमदार कृष्णा गजबे- विद्यार्थ्यांनी...

स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी वेळेचे योग्य व्यवस्थापन हवे- आमदार कृष्णा गजबे- विद्यार्थ्यांनी अभ्यासिकाचा उपयोग करून आपली यशस्वी वाटचाल करावी- नामदेव किरसान…..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

देसाईगंज (गडचिरोली) :- देसाईगंजतालुक्यातील कुरुड येथे काल सोमवार दिनांक -६ नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास सुशिक्षित बेरोजगार युवक मेळावा,शेतकरी मेळावा,शासनाच्या विविध कर्ज सुविधा योजनेविषयी तथा सेल्फी विथ बाप्पा उपक्रमाचे आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते उद्घाटन व बक्षिस वितरण सोहळा पार पाडण्यात आला.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेत विदर्भातील विद्यार्थ्यांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी अल्प आहे.या भूमीचे ऋण फेडण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेला न घाबरता आत्मविश्वासाने समोर जावे.दिवसभराचे ‘मिनिट टू मिनिट’ नियोजन करावे. वेळेचे सुरळीत व्यवस्थापन करुन अभ्यासक्रमातील बारकावे ओळखावे.अभ्यासक्रमातील संबंधित विषयांची माहिती घेऊन त्यानुसार सातत्यपूर्ण अभ्यास करुन आत्मविश्वासाने परीक्षा द्यावी तरच यशप्राप्ती होईल; असे प्रतिपादन आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांनी केले.

मेळाव्याचे आयोजक मनोज ढोरे व मित्र परिवार तर्फे आयोजित स्पर्धा परीक्षा करीयर मार्गदर्शन शिबिराच्या उद्घाटना प्रसंगी बोलत होते.सोबत देसाईगंज येथील पत्रकार बंधू तसेच सामाजिक कार्यकर्ते यांचे पोलीस दक्षता पीपल असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना विशेष मार्गदर्शन वामनराव सावसाकडे यांनी शेतीतून जास्तीत जास्त नफा कसा मिळवता येईल यावर मार्गदर्शन केले.सोबतच ओबीसी महामंडळ गडचिरोली यांच्या वतीने अनेक प्रकारचे कर्ज सुविधा विषयक मार्गदर्शक म्हणून लाभलेले प्रवीण निकुरे यांनी सुशिक्षित बेरोजगार युवकांना त्याचप्रमाणे मेळाव्यातील नागरिकांना मार्गदर्शन केले.

सदर मेळाव्याच्या कार्यक्रमाचे उदघाटक आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे,अध्यक्ष नामदेव किरसान,सुनीलभाऊ पारधी,वामनराव सावसाकडे,राजीव सिंग,प्रवीण निकूरे,माजी बिडोओ प्रकाश तोडकर,माजी जिल्हा परिषद सदस्य दिगांबर मेश्राम,मनोहर नीमजे,विजय कुंभलवार,दिनेश ठाकरे,महादेव ढोरे,शामराव ढोरे,नवलाजी राऊत,मधुकर लाभे,एकनाथ बुरडे,विलास ठाकरे किशोर भागडकर,भाऊराव चौधरी,कृष्ण कुथे,आणि कुरुड वासिय जनता-जनार्दन उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रजनीकांत गुरूनुले, गजानन दुंबे,गणेश भोयर,रोशन ठाकरे,मंगेश ढोरे, अनिल चिंचोलकर,विनोद दिघोरे,सूरज चौधरी,उमेद देसाईगंज (वडसा)येथील महिला कॅडर तसेच युवक/युवती यांनी नियोजन अथक परिश्रम घेतले.सदर मेळाव्यास कुरुड,कोंढाळा व शिवराजपुर येथील युवकांनी सहभाग घेतला होता.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धावत्या कारने अचानक घेतला पेट; सुदैवाने जीवितहानी टळली..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मुलाचा सैनिकी शाळेच्या प्रवेश परीक्षेचा पेपर असल्याने चारचाकी वाहनाने गडचिरोलीसाठी निघालेल्या कुटुंबियांच्या कारने अचानकपणे आरमोरी-गडचिरोली मार्गावर पेट घेतल्याची घटना आज,शनिवार १८...

उन्हाच्या तडाख्यात कोसळणार अवकाळी पावसाच्या सरी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात उन्हामुळे लाहीलाही होत आहे.सकाळी दहा वाजल्यापासूनच उकाड्याने नागरिक हैराण होऊ लागलेत.अनेक जिल्ह्यांचा पारा दिवसागणिक वाढू लागल्याने दुपारच्या...

वाढत्या उष्णतेपासून स्वतःचा बचाव करण्याचे आवाहन.. – उष्माघाताची लक्षणे आणि उपाययोजना..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-जिल्ह्यात सध्या तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून,कडक उन्हामुळे उष्माघात (Heat Stroke)होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही बाब गांभीर्याने घेत जिल्हा आरोग्य...

सावधान..! प्रधानमंत्री लोन योजनेच्या नावाने बनावट जाहिरातीचा आधार..

उद्रेक न्युज वृत्त :-हल्ली फसवणूक करणाऱ्यांचे नेटवर्क दिवसेंदिवस वाढत चालल्याने नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे झाले आहे.कोणत्याही मोठ्या आमिषाला बळी पडण्यापूर्वी माहितीची खातरजमा करणे अत्यंत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!