- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-मागील महिन्याचे सोने-चांदीचे दर आणि आत्ताचे दर बघितले तर सोने आणि चांदीच्या दरांनी ऐतिहासिक उसळी घेतली आहे.२४ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅममागे तब्बल ७ हजार ८०० ची,तर चांदीच्या दरात प्रतिकिलोमागे ३० हजार रुपयांची विक्रमी वाढ झाली आहे.मागील महिन्याच्या ३ नोव्हेंबरला ३ टक्के जीएसटी विना १ लाख २१ हजार १०० रुपये सोने तर चांदीचे दर १ लाख ५१ हजार रुपये होते.आता काल,बुधवारी ३ डिसेंबरला सोन्याचे दर १ लाख २८ हजार ९०० रुपये,तर चांदी १ लाख ८१ हजार ८०० रुपयांवर पोहचली.विशेष म्हणजे,या तेजीमुळे मंगळवारच्या तुलनेत बुधवारी एकाच दिवसात सोने ९०० रुपयांनी तर चांदीचे दर ५ हजार ५०० रुपयांनी वाढले.या विक्रमी भाववाढीचा कल पाहून सराफा तसेच गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. गुंतवणूकदारांसाठी सोने-चांदी पुन्हा एकदा सर्वाधिक सुरक्षित आणि आकर्षक गुंतवणूक म्हणून सिद्ध होत आहे.मात्र,सर्वसामान्यांसाठी मोठा झटका मानला जात आहे.सोन्या-चांदीच्या दरातील ही मोठी वाढ प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय घडामोडी,आर्थिक अनिश्चितता आणि मध्यवर्ती बँकांच्या धोरणांचा थेट परिणाम आहे.जागतिक स्तरावर विविध ठिकाणी भौगोलिक आणि राजकीय तणाव वाढला आहे.अशा अनिश्चित परिस्थितीत, गुंतवणूकदार जोखीम कमी करण्यासाठी इक्विटी किंवा इतर अस्थिर मालमत्तांमधून पैसे काढून सोन्यासारख्या सुरक्षित मालमत्तेत गुंतवित आहेत.जगभरात महागाईचा दर अजूनही उच्च असल्याने, गुंतवणूकदार महागाईच्या नुकसानीपासून बचावासाठी सोने आणि चांदीकडे वळत आहेत.तज्ज्ञांच्या मते,सध्याची तेजी कायम राहण्याची शक्यता आहे.
- Advertisement -

