Thursday, September 24, 2026
Homeलाखांदूरसोने गहाण ठेवले; ६८ लाखाच्यावर कर्जही दिले पण लीलावा दरम्यान बिंग फुटले..-३...

सोने गहाण ठेवले; ६८ लाखाच्यावर कर्जही दिले पण लीलावा दरम्यान बिंग फुटले..-३ हजार ५५५.२४ ग्रॅम सोन्यापैकी केवळ २९५.५१ ग्रॅम सोने खरे….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

लाखांदूर(भंडारा):-पतसंस्था शाखा प्रबंधक व सोने परीक्षक म्हणून नियुक्त सोनाराने संगनमत करून ५ व्यक्तींकडून नकली सोने गहाण ठेवीत तब्बल ६८.७२ लाख रुपयांचे कर्ज मंजूर करून पतसंस्थेची फसवणूक केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. विरली बु.येथील स्वामी विवेकानंद अकृषक सहकारी पतसंस्थेत गहाण सोने लिलावादरम्यान ही घटना उघडकीस आली. 

याप्रकरणी लिलाव अधिकारी म्हणून नियुक्त बारव्हा येथील स्वामी विवेकानंद अकृषक पतसंस्थेचे शाखा प्रबंधक दिनेश विनोद हुकरे यांच्या तक्रारीवरून स्थानिक लाखांदूर पोलिसांनी तालुक्यातील विरली बु. येथील मीनाक्षी कैलास मस्के,ललिता रामकृष्ण मस्के, रामकृष्ण सदाशिव मस्के,लेकराम महादेव मेंढे, सोमेश्वर गुलाब बेदरे आदी ५ कर्जदार इसमांसह पवनी तालुक्यातील लोणारा येथील तत्कालीन शाखा प्रबंधक नरेंद्र श्रावण मेंढे व कैलाश रामकृष्ण मस्के यांच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस सुत्रानुसार,सन २०१८ ते २०२१च्या सुमारास घटनेतील पाचही कर्जदार व्यक्तींनी नियमित अंतराने स्थानिक विरली बु.पतसंस्थेच्या शाखेत ३ हजार ५५५.२४ ग्रॅम सोने गहाण ठेवून लाखो रुपये कर्जाची उचल केली होती.विहीत कालावधीत गहाण ठेवलेल्या सोन्याच्या रकमेचा भरणा न केल्याने पतसंस्था प्रशासनांतर्गत गहाण ठेवलेल्या सोन्याचा लिलाव आयोजित करण्यात आला होता.लिलावावेळी गहाण सोन्याच्या परीक्षणासाठी दुसऱ्या सोनाराची नियुक्ती करण्यात आली होती.परीक्षकाने सोन्याचे परीक्षण केले असता गहाण ठेवलेल्या ३ हजार ५५५.२४ ग्रॅम सोन्यापैकी केवळ २९५.५१ ग्रॅम सोने खरे आढळले.उर्वरित ३ हजार २५९.७३ ग्रॅम सोने नकली असल्याचे उघडकीस आले.या घटनेत लिलाव अधिकारी म्हणून नियुक्त शाखा प्रबंधकांनी विरली बु.येथील पतसंस्थेच्या तत्कालीन सोने परीक्षक व तत्कालीन शाखा प्रबंधक यांनी संगनमत करून नकली सोने गहाण ठेवीत घटनेतील ५ कर्जदार व्यक्तींना तब्बल ६८.७२ लाख रुपयांचे कर्ज मंजूर करून फसवणूक केल्याच्या प्रकार समोर आला.तक्रारीवरून ठाणेदार सचिन पवार यांच्या मार्गदर्शनात घटनेतील ७ आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

डुंबरसात्या आणण्यासाठी जंगल परिसरात गेलेल्या इसमाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गावालगतच्या जंगल परिसरात 'डुंबरसात्या' म्हणजेच मशरूम आणण्यासाठी गेलेल्या एका ४५ वर्षीय इसमाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना आज,गुरुवार २४ सप्टेंबर रोजी...

कुरुड,कोंढाळा,सावंगी व विसोरा गावातील रिक्त कोतवाल पद भरण्यास शासनाची मान्यता.. – महिला आरक्षण व रिक्त पदे भरण्याकरिता जातीचा प्रवर्ग निश्चित करण्यासाठी विशेष सभा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज तालुक्यातील कुरुड,कोंढाळा,सावंगी व विसोरा गावातील गेल्या अनेक कालावधीपासून रिक्त असलेले कोतवाल(महसुल सेवक)पद भरण्यास शासनाने मान्यता दिली असून संबंधित गावातील...

कृषी विभागातील तब्बल १४ हजार ४४५ तांत्रिक अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून दुष्काळग्रस्तांना एक दिवसांचे वेतन..

उद्रेक न्युज वृत्त :-निसर्गाच्या लहरीपणाचा नेहमीच शेतकरी बांधवांना फटका सहन करावा लागतो आहे. कधी अवकाळी पाऊस,तर कधी किडीचा प्रादुर्भाव,तर कधी ऐन हंगामात धो-धो पावसामुळे...

सायबर फसवणूक टाळण्यासाठी डिजिटल व्यवहारात सतर्कता आवश्यक- इंटर-ऑपरेबल क्रिमिनल जस्टिस सिस्टीमचे राज्य समन्वयक संजय त्रिपाठी – अनोळखी लिंक,संदेश अथवा आमिषांना प्रतिसाद देण्यापूर्वी त्यांची खातरजमा...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-डिजिटल व्यवहार आणि सोशल मीडियाचा वापर वाढत असतांना सायबर गुन्ह्यांच्या पद्धतीही बदलत आहेत.ऑनलाइन आर्थिक फसवणूक आणि वैयक्तिक माहितीच्या गैरवापरापासून स्वतःचे संरक्षण...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!