उद्रेक न्युज वृत्त
छत्तीसगड :- छत्तीसगडमध्ये आज,गुरुवारी सुरक्षा दलांनी ७ नक्षलवाद्यांचा खात्मा केला.नारायणपूर पोलिसांनी २ माओवाद्यांचे मृतदेह तर अबुझमद पोलिसांनी ५ नक्षलवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेतले आहेत. घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठाही सापडला आहे.बिजापूर, दंतेवाडा आणि नारायणपूर जिल्ह्यांच्या सीमेवरील अबुझमद भागात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली.
अबुझमद येथील रेकावाया भागात मोठ्या कॅडरचे नक्षलवादी उपस्थित असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.या माहितीच्या आधारे पोलीस दलाने संयुक्त कारवाई सुरू केली.ज्यामध्ये दंतेवाडा,बस्तर आणि नारायणपूर जिल्ह्यातील एक हजारहून अधिक डीआरजी आणि एसटीएफचे जवान ऑपरेशनवर गेले होते.

