Monday, October 12, 2026
Homeगडचिरोलीसीईओचा कारवाईचा सपाटा; आता चातगावचा ग्रामसेवक निलंबित..

सीईओचा कारवाईचा सपाटा; आता चातगावचा ग्रामसेवक निलंबित..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-नुकतेच काही दिवसांपूर्वी शासकिय निधीचे नुकसान करणे व इतर अनियमितता करून कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी गडचिरोली जिल्ह्याच्या कुरखेडा तालुक्यातील पुराडा ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक म्हणजेच ग्रामपंचायत अधिकारी निलेश पी.जवंजाळकर यांना गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी(सीईओ)सुहास गाडे यांनी आदेश जारी करून निलंबित केल्याचे प्रकरण ताजे असतांनाच आता गडचिरोली जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील चातगाव येथील ग्रामपंचायत अधिकारी(ग्रामसेवक)रणजीत जयसिंग राठोड यांनाही मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी निलंबित केल्याने जिल्ह्याच्या पंचायत विभागात एकच खळबळ उडाली असून आता पुढील नंबर कुणाचा? याकडे सर्वांच्या नजरा भिडल्या आहेत.निलंबन कालावधीत राठोड यांचे मुख्यालय पंचायत समिती एटापल्ली येथे निश्चित करण्यात आले आहे.
धानोरा पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या चातगाव
ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक म्हणजेच ग्रामपंचायत अधिकारी रणजीत राठोड यांच्या विरोधात गावकऱ्यांनी ग्रामपंचायतीमध्ये मनमानी कारभार,अनियमितता व गैरव्यवहार केल्याच्या तक्रारी केल्या होत्या.विविध विकास कामांच्या हिशेबाची मागणी केली असता हिशेब न देणे,ग्रामसभेत हिशेब सादर न करणे,ग्रामसभांना उपस्थित न राहणे,तब्बल तीन ग्रामसभेत गैरहजर राहून मनमानी कारभार चालवला होता.याबाबतच्या तक्रारींचा पाढा जिल्हा परिषदेचे  मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांच्याकडे जाताच दखल घेण्यात आली.त्यानुसार, ग्रामपंचायत चातगाव येथील दप्तर तपासणी करण्यात येणार असून तपासणी व चौकशीदरम्यान अडथळे निर्माण होऊ नयेत,यासाठी महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा(शिस्त व अपील)नियम,१९६४ अधिनियम (तीन/एक) नुसार राठोड यांना निलंबित करण्यात आले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आरमोरी तहसिल कार्यालयासमोर विविध मागण्यासंदर्भात आजपासून बेमुदत उपोषण.. -सामाजिक कार्यकर्त्या प्रज्ञा निमगडे यांचेसह प्रा. मुनिश्वर बोरकर व कार्यकर्ते बसले होते बेमुदत उपोषणाला..

उद्रेक न्युज वृत्त  आरमोरी(गडचिरोली):-आरमोरी शहरातील शासकीय जागेवर भुमाफियांनी अतिक्रमण करून जागा अकृषक केली व बेकायदेशीर प्लॉट पाडून विक्रीचा प्रयत्न करू पाहणाऱ्यांवर कायदेशीर गुन्हे दाखल करून...

गडचिरोलीच्या जलसंधारण व कृषी मूल्यवर्धन उपक्रमांचे नवी दिल्लीत सादरीकरण.. -जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी मांडली जिल्ह्याची कामगिरी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-पंतप्रधान धन-धान्य कृषी योजनेच्या वर्षपूर्तीनिमित्त नवी दिल्ली येथे आयोजित राष्ट्रीय कार्यक्रमात गडचिरोली जिल्ह्यातील जलसंधारण, दुष्काळ प्रतिकारक्षमता आणि कृषी मूल्यवर्धनाच्या उपक्रमांचे सादरीकरण...

मतदानाचा अधिकार सुरक्षित ठेवण्यासाठी देसाईगंज येथे महाविकास आघाडीचे निदर्शने आंदोलन..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-प्रत्येक पात्र नागरिकाचा मतदानाचा अधिकार सुरक्षित राहावा आणि निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता असावी,याकरिता आज,सोमवार १२ ऑक्टोंबर रोजी आरमोरी विधानसभा क्षेत्रातील महाविकास आघाडीचे पदाधिकारी...

धावत्या ट्रकचा टायर फुटून भीषण आग; दोघांचा ट्रकमध्येच होरपळून मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त :-फुलकोबी घेऊन जाणाऱ्या धावत्या ट्रकचा अचानक टायर फुटल्याने ट्रकला भीषण आग लागून क्षणात आगीने रौद्ररूप धारण केले.आग इतकी वेगाने पसरली की...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!