Tuesday, September 8, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तसावधान..! सायबर चोरट्यांचा आणखी एक नवा फंडा.. - आता 'Download E-PAN' द्वारे...

सावधान..! सायबर चोरट्यांचा आणखी एक नवा फंडा.. – आता ‘Download E-PAN’ द्वारे फसवणूक..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-सायबर चोरटे म्हणजेच ऑनलाईन फसवणूक करणारे गुन्हेगार विविध प्रकारच्या क्लुप्त्या वापरून सर्वसामान्य नागरिकांसह लखपती लोकांच्या घाम गाळून कमावलेला पैश्यांवर डल्ला मारत आहेत. कधी कोणती युक्ती वापरतील याचा नेम नाही.मागील महिन्यात ‘आरटीओ चालान’ च्या नावाने एपीके फाइल पाठवून मोबाईल हॅक करण्याचा प्रकार समोर आला होता.छत्रपती संभाजीनगरच्या छावणीतील एका मेडिकल व्यावसायिकाने आरटीओ चालान नावाची ‘एपीके’ फाइल इन्स्टॉल करताच क्षणात मोबाईल हॅक झाला आणि काहीच मिनिटांतच मोबाईलमधून ९ लाख रुपये गायब झाले होते.म्हणजेच बँकेतून झटपट रक्कम कपात झाल्याचे झटपट मॅसेज यायला सुरुवात झाली होती.अश्यातच आता सायबर चोरट्यांनी एक नवा फंडा आणला असून पॅन कार्डच्या नावाखाली स्कॅम सुरू केला आहे. ‘Download E-PAN’ नावाने येणाऱ्या बनावट ईमेलद्वारे लोकांना गंडवले जात आहे.हा ईमेल पाहून अनेकांना वाटते की सरकारकडून आलेली अधिकृत माहिती आहे,पण सत्य वेगळे आहे.हा ईमेल पूर्णपणे बनावट असून,त्यामधून तुमचे चं खाते,वैयक्तिक माहिती आणि डिजिटल सुरक्षा धोक्यात येऊ शकते.
स्कॅममध्ये नागरिकांना सांगितले जाते की, ‘तुमचे  नवीन PAN 2.0 कार्ड तयार आहे.खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून ते डाउनलोड करा.’ ईमेलमध्ये सरकारी लोगो,QR कोड,आणि आकर्षक डिझाईन दिले जाते जे पाहून तो अधिकृत वाटतो.पण,खरा हेतू वेगळाच असतो त्या लिंकवर क्लिक करताच तुम्ही स्कॅमर्सच्या बनावट वेबसाइटवर पोहोचता.त्या बनावट वेबसाइटवर तुमच्याकडून नाव,मोबाईल नंबर,आधार क्रमांक,पॅन नंबर,बँक डिटेल्स,पासवर्ड्स अशी महत्त्वाची माहिती मागवली जाते.एकदा ही माहिती दिल्यावर तुमच्या बँक खात्यातून पैसे चोरले जाऊ शकतात.त्याचा गैरवापर करून तुमच्यावर कर्ज काढले जाऊ शकते किंवा ओळखचोरीही होऊ शकते.त्यामुळे कोणत्याही अनोळखी ईमेलवरील लिंकवर क्लिक करू नका.फक्त अधिकृत वेबसाइट्सचा वापर करा उदाहरणार्थ,पॅनसंबंधित माहिती किंवा सेवा हवी असल्यास www.incometax.gov.in या वेबसाइटलाच भेट द्या.
बँक किंवा आर्थिक व्यवहारासंबंधित माहिती कुठेही सहज देऊ नका.ई-पॅनच्या नावाने सुरु झालेला ‘PAN 2.0’ स्कॅम सामान्य नागरिकांना लक्ष्य करत आहे. माहितीअभावी अनेक जण त्यात अडकत आहेत. त्यामुळे तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीच्या व्यक्तींना असा ईमेल आल्यास जागरूक राहा आणि योग्य ती खबरदारी घ्या.सावधगिरी बाळगणे हीच खरी सुरक्षा आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गावाजवळच दर्जेदार शिक्षण; चार शाळा बनणार ‘मॉडेल शाळा’..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आदिवासीबहुल आणि दुर्गम एटापल्ली तालुक्यातील विद्यार्थ्यांना गावाजवळच आधुनिक, गुणवत्तापूर्ण आणि सर्वांगीण शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तालुक्यातील चार शाळा ‘मॉडेल शाळा’...

भरती परीक्षा सुधारणांसाठी उच्चस्तरीय टास्क फोर्स गठीत; राज्यातील सर्व सहा विभागांना देणार प्रत्यक्ष भेटी.. – थेट संवादासह आपल्या सूचना व अभिप्राय संबंधित विभागाच्या ई-मेलवर...

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक,विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ४ सप्टेंबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयान्वये उच्चस्तरीय टास्क फोर्स गठीत...

‘युजीसी-नेट’ परीक्षा केंद्राच्या दोनशे मीटर परिसरात मनाई आदेश जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राष्ट्रीय परीक्षा एजन्सी(NTA),नवी दिल्ली यांच्यामार्फत आयोजित 'विद्यापीठ अनुदान आयोग-राष्ट्रीय पात्रता परीक्षा'(UGC-NET)जून-२०२६ ची परीक्षा गडचिरोली येथील शासकीय विज्ञान महाविद्यालय,चामोर्शी रोड,कन्नमवार नगर येथे...

देसाईगंजच्या जुनी वडसा येथील सिटी सर्व्हे प्रक्रिया अंतिम टप्प्यात; हरकतींसाठी पंधरा दिवसांची मुदत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भूमी अभिलेख विभागामार्फत देसाईगंज शहराच्या मौजा-जुनी वडसा येथील नगर भूमापन(सिटी सर्व्हे)प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून, जमीनधारकांचे हक्क व सीमा दर्शविणारा प्रारूप...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!