Sunday, September 6, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तसावधान....!पॅनकार्ड संबंधित तुम्हालाही येऊ शकतो फेक मॅसेज

सावधान….!पॅनकार्ड संबंधित तुम्हालाही येऊ शकतो फेक मॅसेज

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-मार्च महिना आला की आयकर रिटर्न,पॅनकार्ड म्हणजेच आर्थिक गोष्टींशी संबंधित विषयांची चर्चा सुरु होते.लोकांची होणारी ही धांदल लक्षात घेत अनेक सायबर गुन्हेगार फसवणूक करण्यासाठी दबा धरुन बसलेले असतात.यादरम्यान, मोबाइलवर कॉल आणि मेसेज करत लोकांची फसवणूक केली जाते.सध्या अशाच प्रकारे सायबर चोरांकडून गंडा घातला जात असून वेळेवर सतर्कता बाळगली नाही तर आपण त्याला बळी पडू शकतो. सध्या स्थितीत लोकांची फसवणूक करण्यासाठी सायबर गुन्हेगार पॅनकार्डची मदत घेत आहेत.तुमचे पॅनकार्ड बँक खात्याशी लिंक नसल्याचे सांगत ही फसवणूक केली जात आहे.’जर तुम्ही पॅन कार्ड आणि बँक खाते लिंक केले नाही तर तुमचे खाते बंद होईल’, असे या मेसेजमध्ये सांगितले जाते.यानंतर ॲपच्या माध्यमातून लाखो रुपयांची फसवणूक केली जाते. अनेक ठिकाणी आठवडाभरात पॅनकार्ड फसवणुकीचे  अधिक गुन्हे दाखल झाले आहेत.त्यामुळे पोलिसांनी लोकांना सायबर चोरांपासून सावधान राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. 

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद-२०२७’.. गडचिरोली जिल्ह्यातील युवकांना पंतप्रधानांसमोर नेतृत्वगुण,नवकल्पना मांडण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पनेत युवाशक्तीचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी ‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद -२०२७’ या राष्ट्रीय उपक्रमाला ‘विकसित...

पोलीस अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून एएसआयची आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  नवी मुंबई :-काही दिवसांपासून राज्यातील महाराष्ट्र पोलीस प्रशासनात खळबळ उडवून देणाऱ्या घटना उघडकीस येऊ लागल्या आहेत.मागील महिन्याच्या १६ ऑगस्टला नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील...

आता कांद्यानेही आणले सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच दिवसांपासून पांढऱ्या कांद्यानी सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणलेले असतांनाच आता लाल कांद्यानेही भाव खाऊन  सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.हल्ली विविध शहरांच्या...

तलावात मासे पकडत असतांनाच पाय घसरल्याने तलावात पडला; चिमुकल्याचा तलावात बुडून मृत्यू.. -दुसऱ्या घटनेत भारतीय सैन्य दलातील जवानाचा पाण्यात बुडून मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील निलज गावातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. शाळेला सुट्टी असल्याने मित्रांसोबत गाव नजीकच्या तलावात मासे पकडण्यासाठी गेलेल्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!