- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा तालुक्यातील आंधळी,नवरगाव,वाघेडा,बेलगाव,खैरी,मा लदुगी आणि घाटी या सात गावांतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासासाठी सकाळी व सायंकाळी नियमित बससेवा उपलब्ध करून द्यावी,अशी ठाम मागणी ग्राम बाल संरक्षण समिती,आंधळी व बाल पंचायतच्या वतीने करण्यात आली आहे.
‘कुटुंब सक्षमीकरण आणि कुटुंब आधारित पर्याय काळजी’ या प्रकल्पांतर्गत गावामध्ये ग्राम बाल संरक्षण समिती व बाल पंचायत गठीत करण्यात आली असून,प्रशिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण,सामाजिक जबाबदारी आणि निर्णयक्षमता विकसित करण्याचे काम सुरू आहे.
सातही गावांतील विद्यार्थ्यांना दररोज शाळेत ये-जा करण्यासाठी नियमित वाहतुकीची आवश्यकता आहे. सकाळी शाळेत वेळेत पोहोचणे तसेच सायंकाळी शाळा सुटल्यानंतर सुरक्षितपणे घरी परतण्यासाठी बससेवा उपलब्ध होणे आवश्यक असल्याचे निवेदनातून नमूद करण्यात आले.यासंदर्भात विद्यार्थ्यांच्या सह्यांसह वाहतूक नियंत्रक कुरखेडा गौतम गेडाम तसेच पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी रामदास गुंजाळ यांना निवेदन देण्यात आले.यावेळी ग्रामपंचायतीचा ठरावही संबंधित अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला.
निवेदन देतांना गावातील माजी उपसरपंच तथा ग्राम बाल संरक्षण समिती सदस्य अप्रव भैसारे,नानाजी खुणे, पोलीस पाटील प्रकाश जनबंधू,आरोग्य स्वयंसेविका माया कोचे,सुप्रिया बन्सोड,रोशनी लाडे, लीलाधर उईके,संदीप कराडे,हेमंत भानारकर,रुद्र कराडे,चेतन लाडे,साहिल निर्वान,गौरव उईके,भविष्य सहारे,स्वेता लाडे,प्रीती आत्राम,आदित्य उईके,हार्दीक जांभुळकर,मयुरी ठलाल, कुणाल मानकर,चंदू लाडे, विनय नाकाडे,दीपाशु चौरीकर यांच्यासह आंधळी, नवरगाव,वाघेडा,बेलगाव,खैरी, मालदुगी व घाटी या सातही गावांतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी बससेवा गरजेची👇
विद्यार्थ्यांचा सुरक्षित प्रवास आणि त्यांचे शिक्षण अधिक सुलभ होण्यासाठी सातही गावांना जोडणारी नियमित बससेवा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी ग्राम बाल संरक्षण समिती व बाल पंचायतच्या वतीने करण्यात आली आहे.विद्यार्थ्यांच्या या मागणीची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा,अशी अपेक्षा उपस्थित विद्यार्थी व ग्रामस्थांनी व्यक्त केली.
- Advertisement -

