- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे भाव दिवसागणिक वाढत होते.सोने ३ टक्के जीएसटीसह लाख रुपयांवर पोहोचले होते.त्यामुळे सोन्याची खरेदी सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेली.मात्र,आता २४ कॅरेट सोन्याचे भाव तब्बल २,८०० रुपयांनी घसरल्याने
लोकांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे.अश्यातच सोन्याचा भाव आणखी कमी होण्याची शक्यता सराफांनी व्यक्त केली.नागपुरात काल सोमवारी सोन्याचे भाव घसरले.अमेरिका-चीनमधील व्यापार युद्धातील तणाव कमी झाला आणि देशातील शेअर मार्केटच्या तेजीला मदत मिळाली.परिणामी सोन्याचे भाव घसरले. शनिवारच्या ९६,८०० रुपयांच्या तुलनेत सोमवारी भाव ९४,००० रुपयांपर्यंत उतरले.
काल सोमवारी पाच सत्रात सोन्याचे भाव कमी झाले, तर अखेरच्या सत्रात २०० रुपयांनी वाढले. तुलनात्मकरित्या शनिवारच्या ९६,८०० रुपयांच्या तुलनेत काल सोमवारी सकाळच्या सत्रात भाव तब्बल २,१०० रुपयांनी उतरले.त्यानंतर भावात पुन्हा घसरण झाली.सायंकाळी बंद सत्रात २४ कॅरेट सोन्याचे भाव ९४,००० रुपये,२२ कॅरेटचे भाव ८७,४०० रुपयांपर्यंत घसरले.दुसरीकडे किलो चांदीच्या भावात ५०० रुपयांची घसरण होऊ भावपातळी शनिवारच्या ९६,९०० रुपयांच्या तुलनेत ९६,३०० रुपयांवर स्थिरावली.
- Advertisement -

