Tuesday, October 13, 2026
Homeगडचिरोलीसंभाव्य पाणीटंचाईसाठी गावनिहाय नियोजन करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना.. -पाच तालुक्यांमधील ३६ संवेदनशील गावांमध्ये...

संभाव्य पाणीटंचाईसाठी गावनिहाय नियोजन करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना.. -पाच तालुक्यांमधील ३६ संवेदनशील गावांमध्ये भूजल पातळी घसरली..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन उपलब्ध पाण्याचे सूक्ष्म नियोजन,पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे संरक्षण आणि टंचाई निवारणाच्या उपाययोजनांना गती द्यावी.भूजल पातळी घसरलेल्या संवेदनशील गावांची प्रत्यक्ष पाहणी करून गावनिहाय कृती आराखडा राबवावा,अशा सूचना जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली संभाव्य पाणीटंचाई व प्रतिबंधात्मक उपाययोजनांची सविस्तर आढावा बैठक पार पडली.बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे,निवासी उपजिल्हाधिकारी आशिष वानखेडे,ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता विनोद उद्धरवार,जिल्हा जलसंधारण अधिकारी सावन जयस्वाल आणि पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल मोरघडे उपस्थित होते.जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी,तहसीलदार व गटविकास अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले.
भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या अहवालानुसार जिल्ह्यातील ५ तालुक्यांमधील ३६ संवेदनशील गावांमध्ये भूजल पातळी घसरल्याचे बैठकीत निदर्शनास आणण्यात आले.यामध्ये चामोर्शी,एटापल्ली,धानोरा, अहेरी व मुलचेरा तालुक्यांतील गावांचा समावेश आहे.या गावांतील जलस्रोतांची स्थिती,पाण्याची उपलब्धता आणि संभाव्य गरज तपासून विशेष उपाययोजना करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
पाणीटंचाई निवारणासाठी पंचायत समित्यांकडून प्राप्त प्रस्तावांच्या आधारे पहिल्या टप्प्यात ७६ गावांसाठी सुमारे ४ कोटी ३५ लाख रुपये खर्चाच्या ८६ उपाययोजनांचा आराखडा सादर करण्यात आला आहे. यामध्ये विंधन विहिरी,विहीर खोलीकरण आणि नळ पाणीपुरवठा योजनांच्या विशेष दुरुस्तीच्या कामांचा समावेश आहे.गरज व संभाव्य टंचाईची तीव्रता लक्षात घेऊन कामांचा प्राधान्यक्रम निश्चित करावा आणि नियमानुसार मंजुरीची प्रक्रिया पूर्ण करून अंमलबजावणीला गती द्यावी,अशा सूचना देण्यात आल्या.
पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांच्या ५०० मीटर परिघात अनधिकृत बोअरवेल खोदण्यावरील निर्बंधांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.खासगी बोअरवेलमधील अतिउपशामुळे सार्वजनिक जलस्रोत प्रभावित होऊ नयेत,यासाठी महसूल व पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे लक्ष ठेवावे.विनापरवानगी बोअरवेल खोदणाऱ्या वाहनांवर नियमानुसार कारवाई करून जप्तीची कार्यवाही करावी,असेही त्यांनी सांगितले.
शासनाने नागरी व ग्रामीण भागातील पाणीपुरवठ्यात १० टक्के कपात लागू केली असून,त्यानुसार स्थानिक यंत्रणांनी पाणी वितरणाचे नियोजन करावे,अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या.उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासोबतच वितरणातील गळती व अपव्यय रोखण्यावर भर देण्यात आला. ग्रामीण भागातील सौरऊर्जेवर चालणाऱ्या ड्युअल पंपांच्या नळांना तोट्या बसविणे आणि गळतीची दुरुस्ती करण्याची कार्यवाही ग्रामपंचायतींनी करावी, असे सांगण्यात आले.
जलस्रोतांची शाश्वतता वाढविण्यासाठी जिल्ह्यातील १०५ गावांचा स्रोत बळकटीकरण आराखडा तयार करण्यात येत आहे.यामध्ये १४० रिचार्ज शाफ्ट,नाला खोलीकरण, गॅबियन बंधारे आणि जलशोषक खड्ड्यांसारख्या कामांचे नियोजन प्रस्तावित आहे.जिल्हा नियोजन समिती व जलसंधारण विभागाच्या माध्यमातून या कामांचे एकात्मिक नियोजन करून भूजल पुनर्भरण आणि पाणीपुरवठ्याच्या स्रोतांचे बळकटीकरण करण्यावर भर देण्यात आला.
शेतीसाठी उपलब्ध पाण्याचे अंदाजपत्रक तयार करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.उन्हाळी भातपिकासाठी मोठ्या प्रमाणात पाणी लागते.त्यामुळे उपलब्ध पाणीसाठा आणि पिण्याच्या पाण्याची गरज विचारात घेऊन पीक नियोजन करावे.हंगाम व स्थानिक परिस्थितीनुसार कमी पाण्यात येणारी कडधान्ये व इतर पिके घेण्यासाठी,तसेच सूक्ष्म सिंचनाचा वापर वाढविण्यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून जनजागृती करावी,असे त्यांनी सांगितले.
संभाव्य पाणीटंचाईची तीव्रता अधिक असलेल्या गावांना उपविभागीय अधिकारी,तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनी संयुक्तपणे भेटी देऊन परिस्थितीचा आढावा घ्यावा.प्रत्यक्ष पाहणीच्या आधारे आवश्यक उपाययोजना निश्चित करण्यास सांगण्यात आले. जिल्ह्यातील कोणत्याही गावात पाणीटंचाईची परिस्थिती गंभीर होऊ नये,यासाठी संबंधित विभागांनी समन्वयातून प्रस्तावित कामे पूर्ण करावीत आणि पाणीपुरवठ्याच्या स्थितीचा नियमित आढावा घ्यावा,अशा सूचना जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिल्या.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर सिंदेवाहीच्या राज्य महामार्गावर गतीरोधक बसविण्यास सुरुवात.. -अपघातांचा संभाव्य धोका कमी करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम सिंदेवाही(चंद्रपूर):-चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत सिंदेवाही शहरातून जाणाऱ्या राज्य महामार्ग क्रमांक-९ वरील रस्ता सुरक्षेचा मुद्दा...

दुष्काळग्रस्त तालुक्यांत मोफत धान्य वितरणासाठी विशेष नियोजन.. -स्थलांतरितांना इतर ठिकाणच्या रास्तभाव दुकानातून धान्य घेण्याची सुविधा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दुष्काळग्रस्त गडचिरोली व चामोर्शी तालुक्यांतील पात्र कुटुंबांना नियमित मोफत अन्नधान्याचा पुरवठा अखंडित ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष नियोजन केले आहे.शेतीवर अवलंबून असणारे...

‘यूपिआय’ वापरकर्त्यांसाठी दिलासा; शुल्क आकारणी पुढे ढकलली..

उद्रेक न्युज वृत्त :-येत्या,गुरुवार १५ ऑक्टोंबर २०२६ पासून दोन हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या पात्र 'पर्सन टू मर्चंट' व्यवहारांवर ०.४ टक्के एमडीआर म्हणजेच 'मर्चेंट डिस्काउंट...

आश्रमशाळेतील विद्यार्थिनीची आत्महत्या; आदिवासी विकास मंत्र्यांकडून दखल.. -अधीक्षिकेच्या निलंबनाचे निर्देश; कुटुंबीयांना दोन लाख रुपयांचा धनादेश प्रदान..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या कुरखेडा तालुक्यातील सोनसरी येथील शासकीय आश्रमशाळेत इयत्ता आठवीत शिक्षण घेणाऱ्या १४ वर्षीय विद्यार्थिनीच्या आत्महत्येच्या घटनेची आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक उईके...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!