Thursday, July 23, 2026
Homeगडचिरोलीसंजय गांधी निराधार योजनेतील 'या' लाभार्थ्यांचे खाते होणार बंद…-आता ३० मे नंतर...

संजय गांधी निराधार योजनेतील ‘या’ लाभार्थ्यांचे खाते होणार बंद…-आता ३० मे नंतर संजय गांधी निराधार योजना लाभार्थीचे अनुदान सरळ डीबीटीमार्फत…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनांच्या लाभार्थीसाठी पूर्वी तहसील कार्यालयामार्फत लाभार्थीची यादी बँकेला पाठवून त्यानुसार बँकेमार्फत हा निधी लाभार्थीच्या खात्यामध्ये जमा केला जात होता.यामुळे नेहमीच या प्रक्रियेला खूप उशीर व्हायचा.योजनेचे लाभार्थी बँकेच्या चकरा मारत असायचे. परंतु ३० मे नंतर आता या लाभार्थीचे अनुदान सरळ डीबीटीमार्फत म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर योजनेंतर्गत थेट लाभ मिळणार आहे.संजय गांधी निराधार योजना श्रावणबाळ योजना लाभार्थीनी हयात किंवा जिवंत प्रमाणपत्र, आधारकार्ड, बँकेचे पासबुक,आधार लिंक असलेला मोबाईल क्रमांक हे सर्व कागदपत्रे जमा केल्यानंतरच लाभार्थीना अनुदान देण्यात येणार आहे.सदर कागदपत्रे तहसील कार्यालयात,तलाठी/कोतवाल,सेतू केंद्र,महा ई-सेवा केंद्र,ग्रामपंचायत संग्राम केंद्र,स्वस्त धान्य दुकानदार यांच्याकडे जमा करता येतील; अशी माहिती प्राप्त झाली आहे.यामुळे लाभार्थ्यांनी दखल घेण्याची गरज व्यक्त होत आहे.

डीबीटी म्हणजे (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर)अंतर्गत लाभहस्तांतरणाचे प्राथमिक उद्दिष्ट केंद्र सरकारने प्रायोजित केले आहे.निधीच्या वितरणात पारदर्शकता आणणे,चोरी व बोगस लाभार्थीची यादी संपविणे, हा डीबीटीचा उद्देश आहे.देशभर संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थ्यांना आता थेट लाभ हस्तांतरण योजनेंतर्गत लाभार्थीच्या बँक खात्यात जमा होणार आहे.त्यामुळे शासनाने तात्काळ कागदपत्रे सादर करण्यासंदर्भात या योजनेच्या सर्व लाभार्थीना जवळचे तलाठी किंवा कोतवाल यांच्याकडे कागदपत्र जमा करण्याचे निर्देश दिले आहेत.यामुळे आता बोगस लाभार्थ्यांचे खाते बंद करण्यात येणार आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर शेतकऱ्यांच्या खात्यात आजपासून कर्जमाफीची रक्कम जमा होण्यास सुरुवात; पहिली यादी जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना-२०२६' अंतर्गत आज,बुधवार २२ जुलै रोजी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंती दिनाचे तसेच मुख्यमंत्री...

अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण; तर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक किटचे वाटप..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड,देसाईगंज येथे आज,बुधवार २२ जुलै रोजी अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा वृक्षारोपण...

उद्याला महाराष्ट्र बंदची हाक..!

उद्रेक न्युज वृत्त :-देशाची राजधानी दिल्ली येथे सुरू असलेल्या नीट पेपरफुटी आंदोलन प्रकरणाला आता राजकीय वळण येऊ लागले आहे.विशेष म्हणजे, दिल्लीतील जंतर-मंतर आणि संसद...

देसाईगंजच्या शंकरपुर परिसरात सर्वात जास्त पावसाची नोंद; तर २० महसुल मंडळात मुसळधार पाऊस..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या विविध तालुक्यात काल मंगळवारपासून ते आज बुधवार सकाळपर्यंत दमदार पावसाने हजेरी लावली.अजूनही पाऊस सुरूच आहे.२४ तासात जिल्ह्यात सरासरी ५१.४ मिमी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!