Thursday, September 17, 2026
Homeगडचिरोली‘श्री गणेशा आरोग्याचा अभियान-२०२६’ अंतर्गत गणेश मंडळांमध्ये मोफत आरोग्य शिबिरे.. - ‘लोकसंवाद-२०२६’मधून...

‘श्री गणेशा आरोग्याचा अभियान-२०२६’ अंतर्गत गणेश मंडळांमध्ये मोफत आरोग्य शिबिरे.. – ‘लोकसंवाद-२०२६’मधून विविध शासकीय योजनांची माहिती; ‘वीर योजना’बाबतही जनजागृती..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-गणेशोत्सवाचे औचित्य साधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्यभरात १४ ते २५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत ‘लोकसंवाद-२०२६’ आणि ‘श्री गणेशा आरोग्याचा अभियान-२०२६’ राबविण्यात येत आहे.या अभियानांतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील नोंदणीकृत गणेशोत्सव मंडळांच्या ठिकाणी नागरिकांसाठी सामुदायिक आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असून, ‘लोकसंवाद-२०२६’च्या माध्यमातून शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना व उपक्रमांची माहितीही नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष तथा धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष,मंत्रालय,मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने हे अभियान राबविण्यात येत आहे.जिल्ह्यात अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी सर्व संबंधित शासकीय यंत्रणांना समन्वयाने काम करण्याचे निर्देश दिले आहेत.जिल्हा परिषद,शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,जिल्हा सामान्य रुग्णालय,सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय तसेच सर्व तहसीलदार,गट विकास अधिकारी आणि नगर परिषद व नगर पंचायतींच्या मुख्याधिकाऱ्यांना आवश्यक नियोजन व समन्वय करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
  • तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत मोफत तपासणी व औषधोपचार👇
सामुदायिक आरोग्य शिबिरांमध्ये शासकीय व खासगी वैद्यकीय महाविद्यालये,सामान्य रुग्णालय,धर्मादाय रुग्णालये तसेच सेवाभावी सामाजिक संस्थांचा सहभाग राहणार आहे.शिबिरांमध्ये तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी व पॅरामेडिकल कर्मचारी उपस्थित राहून नागरिकांची आरोग्य तपासणी करतील.रक्तदाब,मधुमेह तसेच प्राथमिक व आवश्यक निदानात्मक तपासण्या मोफत करण्यात येतील.गरजेनुसार आवश्यक औषधांचेही मोफत वितरण करण्यात येणार आहे.तपासणीदरम्यान गंभीर आजाराचे निदान झाल्यास संबंधित रुग्णांना पुढील उपचारांसाठी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत उपलब्ध उपचार सुविधा तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून उपलब्ध होणाऱ्या मदतीबाबत आवश्यक मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
  • ‘लोकसंवाद-२०२६’मधून शासकीय योजनांची माहिती👇
गणेशोत्सवाच्या काळात गणेश मंडळांच्या ठिकाणी मोठ्या संख्येने नागरिक येत असल्याने ‘लोकसंवाद-२०२६’च्या माध्यमातून शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना आणि उपक्रमांची माहिती थेट नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.विविध योजनांचे स्वरूप,त्यासाठीची पात्रता, उपलब्ध लाभ तसेच लाभ मिळविण्याची प्रक्रिया याबाबत नागरिकांना माहिती व मार्गदर्शन करण्यात येईल.
याच उपक्रमांतर्गत ‘वीर योजना’बाबतही विशेष जनजागृती करण्यात येणार आहे.शहीद जवानांचे कुटुंबीय,माजी सैनिक व पोलीस बांधव तसेच संबंधित पात्र लाभार्थ्यांच्या कल्याणासाठी उपलब्ध विविध लाभ, शासकीय सवलती आणि सहाय्याबाबत माहिती देण्यात येणार आहे.
  • नागरिकांनी आरोग्य शिबिरांचा लाभ घ्यावा-जिल्हाधिकारी👇
जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी आपल्या परिसरातील नोंदणीकृत गणेश मंडळांमध्ये आयोजित सामुदायिक आरोग्य शिबिरांना भेट देऊन मोफत आरोग्य तपासणी व उपलब्ध आरोग्य सेवांचा लाभ घ्यावा. विशेषतः ज्येष्ठ नागरिक,महिला व बालकांनी या शिबिरांचा लाभ घ्यावा.तसेच ‘लोकसंवाद-२०२६’च्या माध्यमातून विविध शासकीय योजना व ‘वीर योजना’ बाबत माहिती जाणून घेऊन पात्र नागरिकांनी संबंधित योजनांचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सरकारच्या शिष्टमंडळाची चर्चा सफल; मनोज जरांगे पाटलांचे उपोषण मागे..

उद्रेक न्युज वृत्त :-मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्ट २०२६ पासून सुरू केलेल्या उपोषणाची सांगता तब्बल २० व्या दिवशी संपुष्टात आल्याने...

आदर्श प्राचार्य पुरस्कार प्राप्त डॉ.राजाभाऊ मुनघाटे यांचा कुरखेडा शहर विचार मंचाच्या वतीने गौरव..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा ‘डॉ.जे.पी.नाईक आदर्श प्राचार्य’ पुरस्कार प्राप्त करून श्री गोविंदराव मुनघाटे कला व विज्ञान महाविद्यालयाचे उपक्रमशील प्राचार्य डॉ.राजाभाऊ मुनघाटे यांनी गडचिरोली...

पोलीस हवालदार अडकला एसीबीच्या जाळ्यात; पोलिस ठाण्याच्या आवारातच सापळा कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका पोलीस हवालदारास तब्बल ४० हजाराची लाच घेतांना नागपूरच्या एसीबी पथकाने पोलिस ठाण्याच्या आवारातच रंगेहाथ पकडले.सचिन तायडे असे लाचखोर पोलिस हवालदाराचे...

दुपारीच स्टेटमेंट दिला अन् सायंकाळीच निलंबनाचा आदेश धडकला.. – गडचिरोलीच्या जिल्हा शल्य चिकित्सक निलंबित..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-पर्यवेक्षकीय जबाबदारीत अक्षम्य निष्काळजीपणा व दुर्लक्ष करून कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.वर्षा शिवाजी लहाडे यांना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!