Wednesday, June 24, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तशेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; पिएम किसान योजनेच्या २ हजार रुपयांची प्रतीक्षा संपली..!

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; पिएम किसान योजनेच्या २ हजार रुपयांची प्रतीक्षा संपली..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या २० व्या हप्त्याची आतुरतेने वाट बघणाऱ्या शेतकऱ्यांची अखेर प्रतीक्षा संपली असून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा २० वा हप्ता येत्या,शनिवार २ ऑगस्ट २०२५ रोजी वितरित केला जाणार असल्याचे केंद्रीय कृषी तथा शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटले आहे.मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या अध्यक्षतेखाली आज,गुरुवार ३१ जुलै रोजी उच्चस्तरीय बैठक पार पडली.या बैठकीत २ ऑगस्ट रोजी उत्तर प्रदेशच्या वाराणसी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आयोजित होणाऱ्या कार्यक्रमाच्या तयारीबाबत आणि अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत लाभ पोहोचवण्यासाठी सविस्तर चर्चा झाली.बैठकीस देशभरातील ७३१ कृषी विज्ञान केंद्रे (केव्हीके), भारतीय कृषी संशोधन परिषद (आयसीएआर) आणि कृषी विद्यापीठांचे संचालक, कुलगुरू आणि प्रमुख दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम  किसान  योजनेचा मागील १९ वा हप्ता हा २४ फेब्रुवारी २०२५ रोजी बिहारमधील भागलपूर येथील एका कार्यक्रमातून जारी केला होता.त्यातच आता जून,जुलै महिना संपूनही दोन हजार जमा झाले नसल्याने शेतकरी संभ्रमात होते. त्यानुसार आता येत्या २ ऑगस्ट रोजी पीएम किसान योजनेचा २० वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.यात ९.७ कोटी शेतकऱ्यांना सुमारे २० हजार ५०० कोटी रुपये वितरित केले जाणार आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कोंढाळा ग्रामपंचायतीच्या वतीने जागतिक “एकल महिला दिन” साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):- कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचे म्हणजेच एखाद्या महिलेच्या पतीचे निधन झाल्यास एकटेपणाच्या काळात महिलांना सहन करावा लागणारा सामाजिक,आर्थिक व इतर त्रास किती चटके लावणारा असतो;...

कुरखेडा तालुक्याच्या मालेवाडा येथे स्थापन होणार नवीन अप्पर तहसील कार्यालय.. – नागरिक,ग्रामपंचायती आणि संस्थांकडून हरकती व सूचना नोंदविण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्याच्या मालेवाडा येथे नवीन अप्पर तहसील कार्यालय स्थापन करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असून,याबाबत नागरिक,ग्रामपंचायती आणि संस्थांकडून हरकती व सूचना...

उमेद अंतर्गत तयार होणाऱ्या उत्पादनांना मिळणार एकसंध ओळख.. – ‘गडचिरोली ब्रँड’साठी लोगो व टॅगलाईन पाठवा अन् जिंका ३० हजार रुपयांची बक्षिसे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान(उमेद)अंतर्गत स्वयं सहाय्यता समूह (SHG), उत्पादक गट(PG)आणि महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांकडून (FPO)तयार करण्यात येणाऱ्या विविध उत्पादनांना एकसंध...

शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाकडून दखल.. – तीन प्रगतशील शेतकऱ्यांना ‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार’ जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील तीन प्रगतशील शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाने दखल घेत सन २०२३-२४ व २०२४-२५ या वर्षांसाठीचा प्रतिष्ठेचा 'वसंतराव नाईक शेतीनिष्ठ...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!