Saturday, September 5, 2026
Homeगडचिरोलीशेतकऱ्यांना मिळणार बोनसची रक्कम….-नोंदणीकृत शेतकऱ्यांनी महामंडळाला धान विक्री केली असो वा नसो….खात्यावर...

शेतकऱ्यांना मिळणार बोनसची रक्कम….-नोंदणीकृत शेतकऱ्यांनी महामंडळाला धान विक्री केली असो वा नसो….खात्यावर जमा होणार रक्कम

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गडचिरोली :-खरीप पणन हंगाम २०२३-२४ मधील धान खरेदीसाठी नोंदणीकृत शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर राशीची रक्कम अदा करण्याबाबत शासनाने २६ मार्चला परिपत्रक काढले आहे.त्यानुसार नोंदणीकृत शेतकऱ्यांनी महामंडळाला धान विक्री केली असो वा नसो धान उत्पादनाकरिता त्यांच्या धान लागवडीखालील जमीन धोरणानुसार प्रतिहेक्टरी रुपये २० हजार प्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादेत राहून प्रोत्साहन राशी बोनस अदा करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

३१ मार्च पर्यंत सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन मुंबई यांच्या आदेशानुसार गडचिरोली जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना ८५ कोटी ३५ लाख ४७ हजार ७८० रुपये एवढी बोनसची रक्कम खात्यात जमा होणार असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.राज्यातील धान उत्पादक दहा जिल्ह्यांना हा लाभ मिळणार आहे.त्यामध्ये गडचिरोली जिल्ह्याचाही समावेश आहे.सदर योजनेचा लाभ घेण्याकरिता शेतकऱ्यांनी ई-पीक वर ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे.तसेच आदिवासी खरेदी संस्था किंवा महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटीव्ह मार्केटिंग फेडरेशन यांच्यामार्फत चालवण्या जाणाऱ्या खरेदी संस्थांकडे नोंदणी करणे आवश्यक आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गांजाची वाहतूक; तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त,दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या बल्लारपूर-बामणी मार्गावर सापळा रचून पोलिसांनी ओडिशातून आणलेला तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त केला.कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले...

शिक्षक दिन व शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात.. -शिष्यवृत्ती परीक्षेत देसाईगंज नगर परिषद शाळेचे १४ विद्यार्थी पात्र..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षकांच्या कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणारा प्रेरणादायी सोहळा आज,शनिवार ५ सप्टेंबर रोजी नगर परिषद देसाईगंजच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त उत्साहपूर्ण वातावरणात...

बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल कसा होणार? – न्यायालयाने आरोपीवरील दाखल गुन्हे केले रद्द..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणला वा हल्ला केल्याचा गुन्हा दाखल तरी कसा होणार? असे म्हणत...

शिक्षक दिन उत्साहात संपन्न; ‘ज्ञानमित्र’ उपक्रमातून विद्यार्थी बनले विद्यार्थ्यांचे शिक्षक..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंजच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड येथे आज,शनिवार ५ सप्टेंबरला शिक्षक दिन व स्वयंशासन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!