Tuesday, July 14, 2026
Homeगडचिरोलीशेतकऱ्यांच्या जीवावर उठलाय 'वन्यजीव संरक्षण कायदा'…-शेतातील पीक वन्यप्राण्यांच्या घशात; शेतकरी उघड्यावर,अनेकांनी सोडली...

शेतकऱ्यांच्या जीवावर उठलाय ‘वन्यजीव संरक्षण कायदा’…-शेतातील पीक वन्यप्राण्यांच्या घशात; शेतकरी उघड्यावर,अनेकांनी सोडली शेती…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- सध्याच्या घडीला शेती करणे न परवडणारे झाले असतांनाही अनेक शेतकरी बांधव शेती करून,कसे-बसे उदरनिर्वाह करून,जीवन जगत आहेत.लागत खर्च जास्त तर उत्पादन कमी होत असल्याने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला आला आहे.शेतकऱ्यांचे हित जोपासणारे कायदे केवळ कागदोपत्री असल्याचे दिसून येतात.मात्र वन्यजीवांचे संरक्षणाचे कायदे अंमलात येतात.ही शोकांतिका आहे.शासनाच्या वन्यजीव कायद्यामुळे जंगलातील प्रत्येक जीवाला कायद्याचे संरक्षण मिळाले आहे.मात्र वन्यप्राण्यांमुळे शेतकरी असुरक्षित असून त्यांना शेतशिवारात जाणेही कठीण झाले आहे.

बऱ्याच पैकी शेतकऱ्यांच्या खरीप तसेच रब्बी हंगामातील ६० टक्के पीक जंगलव्याप्त शेतालगत आहे.या शेतातील पीक वन्यप्राण्यांच्या घशात जात असल्यामुळे शेतकरी उघड्यावर येत असल्याने अनेकांनी शेती सोडली.दरम्यान वन्यप्राणी शेतपिकांचे नुकसान करीत असून शेतकऱ्यांवरही हल्ले करीत असल्याने धोका वाढला आहे.या हल्ल्यात काही शेतकऱ्यांना जीवही गमवावा लागला असून अनेकांना अपंगत्वही आले आहे.त्यामुळे वन्यजीव संरक्षण कायदा शेतकऱ्यांच्या जीवावर उठल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत.

खरीप हंगामातील पिकांचा फडशा पाडल्यानंतर रब्बी हंगामातही त्यांचा उपद्रव सुरूच आहे.वन्यप्राण्यांमुळे पिके वाचविण्यासाठी शेतकरी जिवाचे रान करीत असले तरी त्यांना यश येत नाही.शेतकरी बाराही महिने शेतात वास्तव्यास राहून दिवसरात्र पहारा देत आहेत.मात्र वन्यप्राण्यांची संख्या इतकी प्रचंड वाढली आहे की, पहारा देऊनही पिकांचे संरक्षण होऊ शकत नाही.

पेरणीपासून पीक हाती येईपर्यंत ग्रामीण भागांतील शेतकरी डोळ्यांत तेल घालून दिवसरात्र पिकांचे रक्षण करून संवर्धन करतो.त्यासाठी त्याला महिन्याकाठी हजार रुपये खर्च येतो,मात्र वन्यप्राण्यांच्या उपद्रव्याला शेतकरी रोखण्यास असमर्थ ठरत आहेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महत्त्वपूर्ण निर्णय..चंद्रपूर डाक विभागातून विभाजन होऊन आता गडचिरोली स्वतंत्र डाक विभाग..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेत डाक विभागाने चंद्रपूर डाक विभागातून गडचिरोली डाक विभागाचे प्रशासकीय विभाजन करण्याची अधिकृत घोषणा केली आहे.या...

पदाचा दुरुपयोग; चार लाखाची झाडे विकली एक लाखात,सरपंच अपात्र..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-काहीजण एखाद्या पदावर विराजमान झाले की,स्वतःला मोठे पदाधिकारी समजून मनमर्जीने निर्णय घेण्याचा सपाटा चालवतांना दिसून येतात.पण,आपल्या मागची पार्श्वभूमी काय होती आणि...

आता भेसळयुक्त आणि दूषित अन्नाची एकाच तक्रारीवर होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त :-भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण म्हणजेच एफएसएसएआयने भेसळयुक्त आणि दूषित अन्नावर कारवाई करण्यासाठी 'फूड सेफ्टी कनेक्ट' ॲप सुरू केले आहे.या...

वसतिगृहातील गंभीर अनियमिततेवर आमदार मसराम संतप्त.. – आरमोरी येथील वसतिगृहांची प्रत्यक्ष पाहणी..

उद्रेक न्युज वृत्त  आरमोरी(गडचिरोली):-आरमोरी शहरातील शासकीय आदिवासी मुला-मुलींच्या वसतिगृहास आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांनी अचानकपणे भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता वसतिगृहातील अनेक...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!