- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-केंद्र शासनाच्या भारतीय क्रीडा प्राधिकरणामार्फत खेलो इंडिया योजनेअंतर्गत राज्यातील क्रीडापटूंना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पुणे येथे खेलो इंडिया राज्य निपुणता केंद्राची स्थापना करण्यात आली आहे.शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी,पुणे येथे १८ जानेवारी २०२५ रोजी या केंद्राचे उद्घाटन झाले असून येथे ॲथलेटिक्स,सायकलींग आणि शूटिंग या क्रीडा प्रकारांसाठी निवासी प्रशिक्षण केंद्र व स्पोर्ट्स सायन्स सेंटर कार्यरत आहे.या अनुषंगाने शूटिंग या क्रीडा प्रकारातील निपुण खेळाडूंसाठी येत्या,गुरुवार २५ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ९ वाजता शिवछत्रपती क्रीडा संकुल,म्हाळुंगे, पुणे येथील शूटिंग रेंजवर निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे.
पात्रता व अर्ज प्रक्रिया👇
या निवड चाचणीसाठी खेळाडूंचा जन्म १ जानेवारी २००५ नंतरचा असणे आवश्यक आहे.तसेच, राज्यस्तरीय प्राविण्य मिळविलेले अथवा राष्ट्रीय स्तरावर सहभाग/प्राविण्य प्राप्त खेळाडूच या चाचणीत सहभागी होण्यासाठी पात्र ठरतील.इच्छुक पात्र खेळाडूंनी परिशिष्ट अ (Annexure-A) नुसार पात्रता तपासून उद्या,२४ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत परिशिष्ट ब व क (Annexure-B,C) नुसार अर्ज ईमेलद्वारे dsogad2@gmail.com या पत्त्यावर सादर करणे आवश्यक आहे.
आवश्यक कागदपत्रे👇
निवड चाचणीसाठी उपस्थित राहतांना खेळाडूंनी पुढील कागदपत्रांच्या मूळ व छायांकित प्रती सोबत ठेवाव्यात-
राज्य/राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा प्राविण्य प्रमाणपत्र
आधारकार्ड,जन्म दाखला,शैक्षणिक कागदपत्रे.
संपर्क👇
अधिक माहितीसाठी व परिशिष्टाकरिता जिल्हा क्रीडा कार्यालय,गडचिरोली येथे संपर्क साधावा.तसेच 9595469847 या क्रमांकावरही आवश्यक मार्गदर्शन मिळू शकते.
या निवड चाचणीद्वारे राज्यातील गुणवंत शूटिंग क्रीडापटूंना दर्जेदार प्रशिक्षण घेण्याची संधी उपलब्ध होणार असून, याचा उपयोग राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील यश मिळविण्यास होईल असे जिल्हा क्रीडा अधिकारी भास्कर घटाळे यांनी कळविले आहे.
- Advertisement -

