Monday, September 21, 2026
Homeगडचिरोलीशिष्यवृत्ती अर्ज महाविद्यालयांनी तात्काळ सादर करावे- अर्ज करण्याची अंतीम तारीख १३ फेब्रुवारी...

शिष्यवृत्ती अर्ज महाविद्यालयांनी तात्काळ सादर करावे- अर्ज करण्याची अंतीम तारीख १३ फेब्रुवारी पर्यंत

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली : – जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ,वरिष्ठ व व्यावसायीक,बिगरव्यावसायीक,अनुदानित व विनाअनुदानित महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी २०२२-२३ शैक्षणिक वर्षातील प्रवेशित अनु.जाती, इमाव,विजाभज व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांना महाडिबिटी ऑनलाईन प्रणालीवर विद्यार्थ्यांची नवीन अर्ज नोंदणी व भरलेले शिष्यवृत्तीचे अर्ज तसेच महाविद्यालयीन स्तरावर अद्यापही भरपुर प्रमाणात प्रलंबित असलेले अर्ज ज्या महाविद्यालयांनी अद्याप पर्यंत या कार्यालयाकडे मंजूरी करीता सादर केलेले नाहीत; त्यांना अर्ज फॉरवर्ड करण्याची अंतीम मुदत १३ फेब्रुवारी २०२३ पर्यंत असल्याने महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी पात्र अर्ज परिपुर्णरित्या तपासणी करुन विहित वेळेत अर्ज मंजूरीच्या प्रक्रियेसाठी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग गडचिरोली कार्यालयाकडे सादर करण्यात यावे. 

महाडिबीटी ऑनलाईन पोर्टलवरील भारत सरकार शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांची नविन अर्ज नोंदणी करण्यासाठी दिनांक १३ फेब्रुवारी २०२३ ही शेवटची संधी असल्याची सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच विद्यार्थी व पालकवर्ग यांनी नोंद घ्यावी.असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण गडचिरोली यांनी केले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महाराष्ट्र शासनाच्या वतीने गडचिरोलीत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गणेशोत्सवाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग,सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि जिल्हा प्रशासन,गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या,मंगळवार २२ सप्टेंबर २०२६ रोजी...

भरधाव ट्रकची कारला मागून जोरदार धडक; दोघांचा करुण अंत,तर पाच जण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या नागभीड तालुक्यातील कोरधा गावाजवळ एक अत्यंत भीषण अपघाताची घटना समोर आली आहे.गावाकडे परत निघालेल्या कुटुंबीयांच्या कारला भरधाव ट्रकने मागून जोरदार...

क्षुल्लकशा कारणावरून बाप-लेकात वाद; बेदम मारहाणीत बापाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-अगदी क्षुल्लकशा कारणावरून बाप-लेकात वाद झाला खरी,पण रागाच्या भरात ३० वर्षीय मुलाने  वडिलांना काठीने बेदम मारहाण केल्याने मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या...

चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात; तीन जणांचा मृत्यू,तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-मुंबईतील कोस्टल मार्गावर आज,रविवार २०  सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात तीन तरुणांचा मृत्यू झाला,तर एकजण गंभीर जखमी झाला.मरीन ड्राईव्हकडून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!