Thursday, September 3, 2026
Homeदेसाईगंजशिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेली राष्ट्रनिर्मिती  होणे आवश्यक-रामदास मसराम यांचे प्रतिपादन…..

शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेली राष्ट्रनिर्मिती  होणे आवश्यक-रामदास मसराम यांचे प्रतिपादन…..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

देसाईगंज (गडचिरोली) :- स्वराज्याची संकल्पना मनाशी बाळगुन शिवाजी महाराजांनी मोगल साम्राज्या विरुद्ध लढा उभारला आपल्या कर्तबगारी व कुशाग्र बुद्धीमत्तेच्या माध्यमातुन महाराष्ट्रातिल अठरापगड जातिंना एकवटुन मावळ्यांची सेना उभारली व जुलमी शासन व्यवस्थे विरुद्ध लढा उभारुन स्वराज्याची निर्मिती केली.आज देशातिल सर्वच समाजाला समान अधिकार मिळवुन देण्यासाठी शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेली शासन व्यवस्था निर्माण होण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन रामदास मसराम यांनी केले.             

देसाईगंज येथिल छत्रपती शिवाजी क्लबच्या वतिने शिवजयंती दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.दरवर्षी प्रमाणे शिवाजी महाराजांची प्रतिकात्मक पालखी व मिरवणूक काढुन समाज प्रबोधनाचा कार्यक्रम क्लबच्या वतिने करण्यात आला.राजेन्द्र वार्डातिल समाजभवनात आयोजित कार्यक्रमाला संबोधित करतांना रामदास मसराम म्हणाले की, माता जिजाऊ यांच्या स्वराज्याच्या संकल्पनेच्या विचारांची कास धरुन शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रातील अठरापगड जातिंना एकत्र करुन मावळ सेना उभी केली.या सर्व मावळ्यांना संघटित करुन जुलमी मोगल साम्राज्या विरुद्ध लढा उभारुन स्वराज्य स्थापन केले या लढ्यात महाराष्ट्रातील तमाम समाज घटकांसह मुस्लिम सैनिकांनीही हातभार लावला.सर्वच समाज घटकांना प्रगतीची समान संधी मिळावी; कोणिही बळजबरी व अन्याय अत्याचार करु नये; सर्वांनी प्रजेचे व स्वराज्याचे रक्षण करावे; अशी शासन व्यवस्था  शिवाजी महाराजांनी निर्माण केली.मात्र कालांतराने समाज व्यवस्थेत सत्ताधाऱ्यांनी बदल घडविला.थोर महापुरुषांच्या विचारांनी प्रेरित होऊन समाज सुधारनेचे व्रत अंगिकारलेल्या महाराष्ट्राच्या मातित प्रतिगामी विचारसरणींनी सत्ता हस्तगत करुन शिवाजी महाराजांच्या मुळ विचार सरणिंवर घात करत शिवरायांच्या स्वप्नांनाच तिलांजली दिली.आज आपण संविधाच्या माध्यमातुन आपले अधिकार वाचविण्यासाठी धडपड करत आहोत.अनेक प्रश्न आज समाजात निर्माण झाली असुन काही मुठभर लोक सत्तेच्या माध्यमातुन बळाचा वापर करुन सर्वसामान्य जनतेचे अधिकार हिरावुन घेत आहेत. सर्वत्र अराजकतेचे वातावरन निर्माण झाले असुन ही समाज व्यवस्था बदलविण्यासाठी शिवरायांना अभिप्रेत असलेली शासन व्यवस्था अस्तित्वात येणे आवश्यक असल्याचे मत रामदास मसराम यांनी व्यक्त केले.

या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रा.दामोधर सिंगाडे,उद्घाटक वन क्षेञ सहाय्यक रमेश घुटके, ओबिसी संघटनेचे तालुकाध्यक्ष लोकमान बरडे,विजय बन्सोड,धनपाल मिसार यांचेसह मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे आयोजन छञपती शिवाजी क्लब चे सागर वाढई,मोरु मोहुर्ले,योगेश कुमरे,निशिकांत काढई,गौरव शिलार,बागडे यांचेसह क्लबच्या सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.समाज प्रबोधनासाठी प्रसिद्ध गायक तुषार सुर्यवंशी यांचा संगितमय कार्यक्रमासह महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आले होते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; उत्कृष्ट मंडळांना मिळणार पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात...

देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील जप्त केलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील १८५ गुन्ह्यांच्या नोंदीतुन जप्त करण्यात आलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा आज,गुरुवार ३ सप्टेंबर रोजी...

अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील लोकमत प्रेस ते सिडको कॉलनी मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात शिक्षकाचा उपचारादरम्यान...

देसाईगंज आदर्श महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.श्रीराम गहाणे यांना आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर.. -उच्च शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील महाविद्यालयीन,विद्यापीठ, अभियांत्रिकी व कला शिक्षण क्षेत्रात समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या प्राचार्य व शिक्षकांचा यथोचित गौरव करण्याच्या उद्देशाने दरवर्षी “डॉ.जे.पी.नाईक आदर्श...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!