Thursday, September 10, 2026
Homeगोंदियाविहिरीत फेकलेल्या अर्भकाची आई निघाली कुमारी माता; प्रेम प्रकरणातून गर्भधारणा..

विहिरीत फेकलेल्या अर्भकाची आई निघाली कुमारी माता; प्रेम प्रकरणातून गर्भधारणा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गोंदिया :-तालुक्यातील एकोडी गावात मन सुन्न करणारी घटना शनिवार २९ नोव्हेंबर रोजी उघडकीस आली होती. चक्क घराच्या आवारात असलेल्या विहिरीतील पाण्यात एक दिवसाच्या बाळाचे मृत अर्भक आढळून आले होते. सकाळच्या सुमारास विहिरीतील पाणी काढण्यासाठी गेले असता सदरची घटना उघडकीस आली.प्राथमिक तपासात मृत अर्भक हे एक दिवसाचे व मुलाचे असल्याचे स्पष्ट झाले. गोंदिया तालुक्याच्या एकोडी गावातील राजेंद्र श्रीराम ठाकरे यांच्या घराच्या आवारात विहीर असून त्यांचे कुटुंबीय नेहमीप्रमाणे शनिवार २९ नोव्हेंबरला सकाळच्या सुमारास विहिरीचे पाणी भरण्यासाठी विहिरीजवळ गेले असता विहिरीत पाहतात तो काय पाण्यात एक मृत अर्भक तरंगताना दिसून आला.सदरची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरली आणि गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत एकच गर्दी केली होती.लागलीच घटनेची माहिती गंगाझरी पोलिस ठाण्याला मिळताच घटनास्थळी एपीआय सुधीर वर्मा पोलिस पथकासह घटनास्थळी दाखल होत  पंचनामा केला.घटनेने परिसरात शंका-कुशंका वाढीस लागून चर्चेला उधाण आले होते.याप्रकरणी एकोडी गावातील एका संशयित कुटुंबाची पोलिसांनी चौकशी सुरू केली होती. याप्रकरणाची चौकशी पूर्ण झाल्यानंतरच यातील नेमके सत्य बाहेर येण्याची शक्यता वर्तविण्यात आली असतांनाच गंगाझरी पोलीस ठाण्याचे एपीआय सुधीर वर्मा यांनी आपल्या पथकासह तपासकार्य सुरू केले असता एका अल्पवयीन मुलीने प्रेम प्रकरणातून गर्भधारणा झालेल्या बाळाला जन्म देताच विहिरीत फेकल्याची धक्कादायक बाब समोर आली.अल्पवयीन कुमारी माता त्यातच आपली समाजात बदनामी होईल, यासाठी तिने हे घृणास्पद कृत्य केल्याचे समोर आल्याने त्या अल्पवयीन मुलीला पोलिसांनी ताब्यात घेत प्रकरणी गंगाझरी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०३(१),१२,२३८ अतंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरणाचा पुढील तपास गंगाझरी पोलिस प्रशासन करीत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन,वारसा हक्क,पदोन्नती व निवासाच्या प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करा- राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नागरिकांचे आरोग्य आणि सार्वजनिक स्वच्छता राखण्यात सफाई कर्मचाऱ्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे.त्यामुळे त्यांच्या वेतन,सेवा,आरोग्य, निवास व आर्थिक सुरक्षिततेशी संबंधित प्रलंबित प्रश्नांचा...

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत विद्यार्थ्यांमध्ये उत्तम मूल्यसंस्कार रुजविणे काळाची गरज-शिक्षणमंत्री दादाजी भुसे – ‘चला शाळेत जाऊया’ अभियानांतर्गत आज विविध शाळांना प्रत्यक्ष भेटी.. – पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शाळेत केवळ पुस्तकी ज्ञान देणे पुरेसे नसून गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच भावी पिढीवर राष्ट्रभक्तीचे आणि उत्तम मूल्यांचे संस्कार रुजवणे गरजेचे आहे.गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातही...

अजब लाचेची गजब कहाणी..! दोन्ही हातांच्या दहा बोटांचा इशारा करून मागितली १० हजाराची लाच.. – पोलीस उपनिरीक्षक व पोलीस अंमलदार एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  छत्रपती संभाजीनगर :-राज्याच्या विविध भागात सरळ-सरळ तोंडी बोलणी करून अनेकजण लाच घेतांना व एसीबीच्या जाळ्यात अडकतांना दिसून येतात.पण, नुकतेच छत्रपती संभाजीनगर(पूर्वीचे औरंगाबाद)शहरात...

उद्याला बँक कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप..!

उद्रेक न्युज वृत्त :-युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स(यूएफबीआय)या बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या संयुक्त संघटनेने उद्या,शुक्रवार ११ सप्टेंबर रोजी एक दिवसीय देशव्यापी संपाची हाक दिली...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!